खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणूक सोमवार दि. २७ जानेवारी रोजी होणार आहे. त्याबाबतची नोटीस शुक्रवारी (दि. १७) सर्व २० नगरसेवकांना प्राप्त झाली आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव झाल्याने नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयाच्या …
Read More »खानापूर तालुका समितीच्यावतीने जांबोटी भागात हुतात्मा दिनाची जनजागृती!
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी जांबोटी भागात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. …
Read More »मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे म. ए. समितीची मागणी बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी आणि मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा तसेच सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगाव व खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. खानापूर …
Read More »हुतात्मा दिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे खानापूर शहरात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे सोमवारी खानापूर शहरात हुतात्मा दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यासाठी पत्रके वाटून जनजागृती …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा
खानापूर : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने महात्मा फुले रोडवरील मराठा सांस्कृतिक भवन, बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा दर्शविला असून तालुक्यातील सर्व युवावर्गाने आणि मराठी भाषिकांनी सदर मेळाव्याला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव …
Read More »खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यामुळे दुचाकी चालक युवक ठार झाला असून दुचाकीच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदीहळ्ळी येथील एका मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मिलिटरी ट्रेनिंगचे शिक्षण घेत असलेले खानापूर …
Read More »हुतात्मा दिन गांभीयनि पाळण्याचा खानापूर म. ए. समितीचा निर्धार!
‘मध्यवर्ती’ च्या उपक्रमांत सक्रिय सहभागाचे आवाहन खानापूर : हुतात्मा दिनी १७ जानेवारी खानापुरातील हुतात्मा स्मारकात सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन दुपारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ९) शिवस्मारकात ही बैठक …
Read More »करंबळ परिसरात दहशत माजविणाऱ्या टस्करला वनविभागाकडून जेरबंद
खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळ गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या “त्या” टस्कराला अखेर वनविभागाने जेरबंद केले. खानापूर तालुक्याच्या वनपरिक्षेत्रात वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथील तज्ञ हत्तींचे पथक खानापुरात दाखल झाले असता लागलीच वनविभागाने मोहीम हाती घेतली आणि हत्तीला पकडण्यात यश मिळवले. खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून …
Read More »हुळंद प्रकरणातील तीन अधिकारी निलंबित
खानापूर : खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील 508 एकर जमिनीच्या प्रकरणात गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आल्याने तीन प्रमुख अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. किरणकुमार (एडीएलआर इनचार्ज), पत्थार (सर्वेयर सुपरवायझर इनचार्ज), आणि मुतगी (सर्वेयर) या अधिकाऱ्यांना त्यांनी चुकीचे कागद केल्याच्या आरोपाखाली निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. हुळंद गावातील सर्वेक्षण क्रमांक …
Read More »पॉवर ट्रेलरमध्ये सापडून शेतकऱ्याचा मृत्यू
खानापूर : आपल्या शेतात पावर ट्रेलरद्वारे काम करत असताना पॉवर ट्रेलर खाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी, सायंकाळी पाचच्या खानापूर तालुक्यातील चापगाव नजीक घडली. सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील (वय 60 वर्ष) आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta