Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

खानापूर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी गुंतले जमीन बळकावण्याच्या मागे

  खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात अनागोंदी कारभार चालला असून तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोरब येथील 164 एकर जागा बळकविण्याचा काही भूमाफियांचा प्रयत्न असल्याचा संशय खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसला आहे. मोरब येथील सर्वे नंबर 21 व 22 येथील जागा अनाधिकृत रित्या बळकाविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असून त्यामध्ये तहसीलदार …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश; इटगी गावातील ४२ विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या मार्गी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ४२ शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणविषयक समस्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी अखेर सोडवली आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच इटगी गावचे ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि ग्रामस्थांनी शाळेच्या मागणीसाठी गाव बंद ठेवून आंदोलन केले …

Read More »

अंजली निंबाळकर यांनी घेतला उत्तराखंडमधील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाचा आढावा

  खानापूर : माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवला. यावरी डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या अखत्यारीतील उत्तराखंड राज्याच्या ‘संघटन सृजन अभियान’ या उपक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. या आढाव्यात त्यांनी आपल्या कामाचा …

Read More »

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांनी दिल्या सूचना

  खानापूर : राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खानापुरात राज्याध्यक्ष एच. एम. रेवाण्णा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना तसेच युवा निधी या सर्व योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारकडून शक्य …

Read More »

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो खो, कबड्डी स्पर्धेचे 18 ऑक्टोबर रोजी आयोजन

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये. 21001, व ट्रॉफी,दुसरे …

Read More »

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘राजा शिवाजी’ संघ केएसपीएलमध्ये बेळगावचे नेतृत्व करणार

  खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग केएसपीएल-२ स्पर्धेत ‘राजा शिवाजी’ हा संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, ती आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केली जाणार आहे. ​माजी आमदार व कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर या राजा शिवाजी संघाच्या मुख्य …

Read More »

हत्तरवाड येथील शेतकऱ्याला सर्पदंशाने मृत्यू

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथील एका शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून गणपती नारायण हलसकर (वय 52) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी, आपल्या शेतामध्ये काम करत असताना विषारी सर्पाने …

Read More »

खानापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री फोडली तब्बल 9 घरे

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी, गुंजी आणि सावरगाळी या तीन गावांतील तब्बल नऊ घरे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री फोडली आहेत. या चोरट्यांनी सावरगाळीतील एका घरातून तब्बल पंधरा लाख रुपये रोख रक्कम, 16 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या असून …

Read More »

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर माजी आमदार अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड!

  बेळगाव : मागील 20 वर्षांपासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निर्विवाद वर्चस्व असलेले माजी आमदार अरविंद पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार व विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा विजायोत्सव …

Read More »

खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तेलंगणाच्या प्रभारी

  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे संघटन सृजन अभियानांतर्गत उत्तराखंडनंतर आता तेलंगणाचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. पक्ष संघटनेमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे यापूर्वीही अनेक राज्यात संघटना सक्षम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दहा दिवस त्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून त्या …

Read More »