Friday , April 17 2026
Breaking News

हलशीत तरुणावर टोळक्याकडून हल्ला

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशी।येथे गैर समजातून एका तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीद महम्मद देवडी याला किरकोळ कारणामुळे मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये देवडी हा जखमी झाला असून, त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवीद व त्याचा मित्र अखील मुल्ला हे खानापूरला जाऊन परत येत असताना शुक्रवारी हेब्बाळ सरकारी शाळेजवळ जाताना दिसला. यावेळी वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. याप्रकरणी नंदगड पोलीस स्टेशन मध्ये नईम राजेसाब चंदूपटेल, राजेसाहेब महम्मदगौस चंदूपटेल, समीउल्ला एन कित्तूर, नियाज एन कित्तूर व सोहिल आर संगोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *