Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी हुतात्मादिन पाळण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तरी म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *