Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी बेळगाव, गुलबर्ग्याच्या आमदारांशी चर्चा; सुरजेवाला यांनी जाणून घेतल्या तक्रारी

  जाहीर वक्तव्य न करण्याची ताकीद बंगळूर : राज्य सरकारवर नाराज असलेल्या कॉंग्रेस आमदारांना शांत करण्यासाठी दुसऱ्या फेरीच्या चर्चेला प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज सुरवात केली. पहिल्या टप्यात बेळगाव आणि गुलबर्गा काँग्रेस आमदारांची स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कोणत्याही आमदाराने पक्ष अडचणीत येईल असे …

Read More »

बेळगावसह १० महानगरपालिकांनी दिली बंदची हाक; संपाचा निर्णय

  बेंगळुरू : राज्यातील १० महानगरपालिकांनी विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक दिली आहे आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १० महानगरपालिका ८ जुलै रोजी पूर्ण दिवस बंद पाळतील आणि महानगरपालिकांचे कर्मचारी सामूहिक रजा घेऊन निषेध करतील. बेळगाव महानगरपालिका आणि बीबीएमपीसह राज्यातील १० महानगरपालिकांचे कर्मचारी विविध मागण्या पूर्ण …

Read More »

भाजप नेते प्रवीण नेत्तारू हत्या प्रकरण: फरार आरोपीला अटक

  बंगळूर : भाजप युवा मोर्चा सदस्य प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली. एनआयएच्या पथकाने कतारहून आलेल्या आरोपी अब्दुल रहमानला आज कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले आहे. प्रवीण नेत्तारूच्या हत्येप्रकरणी एनआयएने आधीच २१ आरोपींना अटक केली …

Read More »

फौजदारी मानहानीचा खटला : शिवकुमारविरुद्धच्या खटल्याला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती

  बंगळूर : उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात ‘भ्रष्टाचार दर यादी’च्या नावाखाली जाहिरात प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध राज्य भाजप शाखेने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली. या प्रकरणातील सह-आरोपी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) लाही न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. भाजप विधान परिषदेचे …

Read More »

खासदार इराण्णा कडाडी यांचा खानापूर समितीतर्फे निषेध

  मराठी भाषिक संतप्त खानापूर : सीमाप्रश्न संपला आहे असे वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदार इराण्णा कडाडी यांचा खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने तीव्र निषेध केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सदर विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला असून असे वक्तव्य मराठी …

Read More »

युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण

  खानापूर : भाषा टिकली तर संस्कृती टिकते त्यामुळे मराठी शाळां वाचविण्यासाठी पालक आणि मराठी भाषिकानी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यात शैक्षणिक साहित्य वितरणाचा शुभारंभ गुरुवारी हलशी येथील सरकारी मराठी शाळा येथे करण्यात आला. …

Read More »

आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार : सिद्धरामय्या

  बंगळुरू : विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याऐवजी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांना खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णविराम लावला. आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तेच पूर्ण पाच …

Read More »

डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या

  आमदार इक्बाल हुसेन; १०० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा बंगळूर : राज्यात नेतृत्व बदलाची मागणी तीव्र झाली आहे, रामनगरचे काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी उघडपणे डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, शिवकुमार यांना पाठिंबा देणारे १०० आमदार मुख्यमंत्र्यांमध्ये बदल घडवू इच्छितात, अशी मागणी केली आहे. त्यांना सुशासन हवे आहे आणि डीके …

Read More »

मुख्यमंत्री बदलाबाबत आमदार, खासदारांशी चर्चा नाही

  रणदीप सिंह सुरजेवाला; बैठकांचा सपाटा सुरूच बंगळूर : राज्यातील नेतृत्व बदलावर अभिप्राय गोळा करण्याची शक्यता एआयसीसीचे सरचिटणीस आणि पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मंगळवारी फेटाळून लावली. दरम्यान, सुरजेवाला यांनी आमदारांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा अहवाल व त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याचे काम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका, युवा समिती निपाणी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा व रेणुका मंदिर येथील उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा तसेच हालसिद्धनाथ मंदिर येथील उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण …

Read More »