Saturday , September 21 2024
Breaking News

कर्नाटक

कारवार येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भव्य दुचाकी रॅली

  कारवार : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार सतिश सैल यांनी दुचाकी चालवून लक्ष वेधून घेतले. हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीत …

Read More »

लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी भाजपाला रोखा

  ॲड. अविनाश कट्टी; ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : देशात भाजपा सत्तेवर आल्यास भारतीय घटना बदलण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि ओबीसीवर अन्याय होणार आहे. शिवाय भारतीय लोकशाही आणि घटना धोक्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून भाजपला रोखले पाहिजे, असे आवाहन ऑल इंडिया …

Read More »

बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवण्णा यांना एसआयटीने घेतले ताब्यात

  बंगळूर : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएस पक्षाचे नेते एचडी रेवण्णा यांना आज ( दि. ४) कर्नाटक सरकारच्‍या विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांनी अटक केली. बंगळुर केआर नगर पोलीस ठाण्‍यात नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्‍यान, कथित सेक्‍स …

Read More »

खानापूरात समितीचा झंझावात; निरंजन सरदेसाई यांची भव्य प्रचार फेरी

  खानापूर : लोकसभा निवडणुक मराठी भाषिकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे मतदारांनी समितीच्या पाठीशी उभे राहुन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी खानापूर शहरात भव्य प्रचार …

Read More »

“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा

  बेंगळुरू : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या कुकर्माची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने धाडस दाखवत प्रज्ज्वलच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. प्रज्ज्वलने सदर महिलेवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले आणि या चित्रीकरणाचा वापर …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात एक ठार, एक जखमी 

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर मोटरसायकल व बस अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 3 रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. संजय शंकर पाटील (वय 43) रा. आत्ताळ ता. गडहिंग्लज असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब केशव पाटील (वय 66) …

Read More »

निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ उद्या खानापूरात भव्य प्रचार फेरी

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी भव्य प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. सरदेसाई यांच्या प्रचार कार्यालयापासून दुपारी तीन वाजता फेरीला सुरुवात होणार असून शिवस्मारक, स्टेशन …

Read More »

देशाला संकटमुक्त करायचे असल्यास काँग्रेसला मतदान करा : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  कारवार : देशाला संकटमुक्त करायचे असल्यास देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. मागील दहा वर्षापासून आपला देश संकटात सापडला आहे. देशात महागाईने कहर माजविला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा भागविणे देखील अशक्य झाले आहे, असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले. …

Read More »

सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आल्यानंतर घरकाम करणारी महिला बेपत्ता

  बेंगळुरू : जेडीएसचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला असला तरी त्यांचे वडील आणि जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नव्या घडामोडींनुसार कर्नाटकचे माजी मंत्री …

Read More »

चापगाव, कारलगा परिसरात समितीचा घरोघरी प्रचार

  खानापूर : ०२ मे २०२४ चापगाव या ठिकाणी, कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारार्थ चापगाव गावभेट दौरा व कोपरा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजन सरदेसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासी आगमन झाले, नंतर “शिवाजी महाराज की …

Read More »