Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

कणकुंबी परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने झोडपले

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिपावसाचा तसेच अंतिजंगलाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी परिसरात बुधवारी दि. ९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावुन झोडपले. मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे व वाढत्या उष्णतामुळे जीव कासावीस होत आहे. त्यातच बुधवारी सकाळपासून हवेत वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. त्यानंतर बुधवारी …

Read More »

शिवबसव कॉलनीमध्ये महिला दिन

निपाणी (वार्ता) : येथील शिव बसव कॉलनी येथे महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगरसेवक शेरू बडेघर यांनी, समाजाने मुलगा, मुलगी असा भेद न करता दोघांकडे समान नजरेने पाहिले पाहिजे. जास्तीत जास्त महिलांनी मोठ मोठ्या पदावर जबाबदारी पार पाडली आहे. …

Read More »

वर्षभर महिलांच्या कर्तृत्व, नेतृत्वाचा सन्मान व्हावा!

नगरसेवक बाळासाहेब देसाई : महिला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप निपाणी (वार्ता) : आज असे एकही क्षेत्र नाही की जेथे महिलांनी त्यांच्या यशाची मोहर उमटवलेली नाही. पुरुषाबरोबर सर्वच क्षेत्रात महिला कार्यरत झाल्या आहेत. कुटुंबाची जबाबदारी पेलून पोलीस विभागातील महिला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केवळ महिला …

Read More »

खानापूर म. ए. समितीची बैठक उद्या

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक गुरूवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. तरी कार्यकारिणीच्या सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सरचिटणीस आबासाहेब दळवी येत कळविले …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील रस्त्याच्या डांबरीकरणाला तब्बल दोन वर्षानंतर सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : जत- जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील अर्धवट असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला तब्बल दोन वर्षानंतर सुरूवात करण्यात आली. जत- जांबोटी महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तसेच डांबरीकरणासाठी २० कोटीचे अनुदान मंजुर करण्यात आले. यामध्ये पारिश्वाड ते खानापूर शिवाजीनगर पर्यंतच्या जांबोटी रस्त्याच्या काम गेल्या दोन वर्षापासून हातात घेतले आहे. याकामा निमित्ताने …

Read More »

‘अंकुरम’मध्ये नाटीकेच्या माध्यमातून महिला दिन

निपाणी (वार्ता) : येथील श्रीनगर मधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक व कर्मचारी सर्व स्टाफ हा महिलांचा आहे. शाळेमध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शाळेच्या स्थापनेचा मुळात उद्देशच असा होता की ग्रामीण भागातील व शहरी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याच उद्देशाने या …

Read More »

संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी पुणे मॅरेथॉनमध्ये चमकला

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वरचा धावपटू प्रविण एम. गडकरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय १० कि.मी. धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. पुणे मॅरेथॉनमध्ये देशभरातील ५०० धावपटूंनी सहभागी झाले होते.. त्यात संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांचा सहभाग संकेश्वरचं नाव मोठं करणार ठरले आहे. धावपटू प्रविणने …

Read More »

महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे : डॉ. शितल भिडे

संकेश्वर (प्रतिनिधी) : महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे दंतरोग तज्ञ डॉ. शितल भिडे यांनी सांगितले. येथील श्री साई भवन येथे श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी महिला योगसाधकांतर्फे डॉ. शितल भिडे यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गौरविण्यात …

Read More »

कौंदल येथे पारायण सोहळा मुहूर्त मेढ कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी विधीवत पुजा होऊन मुहुर्तमेढ कार्यक्रमाला सुरूवात झाली. मुहूर्त मेढ भाजपा नेते खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभहस्ते …

Read More »

माचाळीत शाळा इमारत जुन्या जागेवर उभारावी

खानापूर (प्रतिनिधी) : माचाळी (ता. खानापूर) येथे पाचवी पर्यंतची लोअर प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची पट संख्या १४ आहे. माचीळीत गेल्या कित्येक वर्षापूर्वीची शाळा इमारत होती ती मोडकळीस आल्याने माचाळी गावासाठी १९ लाख रूपये मंजुर करून शाळेसाठी दोन खोल्या बांधण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र काहीनी माचाळी गावापासून दीड किलोमीटर …

Read More »