Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

माणकापूरमध्ये यंत्रमागधारकावर चाकूने हल्ला

  निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे गुरुवारी (ता.४) पहाटे एका व्यक्तीने यंत्रमागधारकावर चाकू हल्ला केला. सागर कुंभार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मनोहर कोरवी असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. जखमी कुंभार यांना चिक्कोडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संशयिताने यापूर्वी माणकापूर ग्रामपंचायत मधील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न

  अशोक, विजयेंद्रसह भाजप नेत्यांना अटक बंगळूर : मध्य बंगळुरमधील कुमार कृपा रोडवरील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अधिकृत निवासस्थानाला बुधवारी घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी राज्य भाजपचे प्रमुख बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह दहाहून अधिक जणांना ताब्यात घेतले. सत्ताधारी काँग्रेस सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप …

Read More »

खानापुर तालुक्यात मुसळधार पाऊस : हब्बनहट्टी श्रीस्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाणार

  खानापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टीचे ठिकाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या 7 ते 8 दिवसापासून धुवांधार पाऊस पडत आहे. परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहत असून हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्रीस्वयंभू मारुतीच्या छतापर्यंत पाणी आले आहे. कणकुंबी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस असाच पाऊस पडला झाला तर स्वयंभू …

Read More »

श्रीराम सेना हिंदूस्थान माडीगुंजी यांच्यावतीने विविध गावातून डेंग्यू, चिकनगुनिया लस

  खानापूर : श्रीराम सेना हिंदूस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुस्कर, उमेश कुऱ्याळकर व पुंडलीक महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम सेना हिंदूस्थान माडीगुंजी यांच्या वतीने माणिकवाडी, नायकोल, कामतगा, भालके, आंबेवाडी, किरावळे या गावामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया लस देण्यात आली. यावेळी माडीगुंजीचे श्रीराम सेना हिंदूस्थान प्रमुख पंकज सावंत, वासुदेव गोरल, रोहीत दूरीकर, मंथन …

Read More »

दि. विनर्स सौहार्द सहकारी संघ जांबोटी यांच्यावतीने शेतकऱ्यांना फळझाडांचे वितरण

  खानापूर : दि. विनर्स सौहार्द सहकारी संघ जांबोटी यांच्यावतीने जांबोटी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आंबा व लिंबूच्या फळझाडांचे मोफत वितरण करण्यात आले. पर्यावरण रक्षणाची गरज व शेतकऱ्यांना फळबागेतून उत्पन्न मिळावे या भावनेतून दि. विनर्स सोहार्दचे चेअरमन श्री. सुरेश गंभीर यांच्या हस्ते या रोपांचे वितरण करण्यात आले. जवळपास शंभर शेतकऱ्यांनी याचा लाभ …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात शालेय संसद निवडणूक

  निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी तसेच शालेय प्रतिनिधींची निवड सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया आधुनिक पद्धतीची ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने पार पाडली. नूतन मराठी विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांच्याकडे विद्यार्थ्यांनी अर्ज …

Read More »

जी. आय. बागेवाडी कॉलेजचे चिखलव्हाळमध्ये बुधवारपासून विशेष श्रमसंस्कार शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे डॉ. श्रीपती रायमाने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून (ता.३) चिखलव्हाळमध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर काळात शाळा मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छता, ग्रामीण शौचालय, बेरोजगारी आणि स्वयंसेवकांद्वारे साक्षरता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. …

Read More »

मुसळधार पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा

  बेंगळुरू : आठवड्याभरात कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड जिल्हे आणि डोंगराळ प्रदेशातील शिमोगा आणि चिक्कमंगळूरू जिल्ह्यांसारख्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू आणि शिमोगा आदी जिल्ह्यात यलो अलर्ट …

Read More »

पोलिसांच्या भीतीने कृष्णा नदी ओलांडताना बोट उलटली; ६ जण बुडाले

  देवरहिप्परगी : विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील बळोती जॅकवेलजवळील कृष्णा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, कृष्णा नदीकाठी एक टोळके जुगार खेळत होते. याचा सुगावा लागताच पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या भीतीने टोळक्याने लागलीच नदीत असलेल्या बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

आमदार सतेज पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बोरगाव येथे भेट देऊन रावसाहेब पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार बंटी पाटील यांनी, रावसाहेब पाटील हे अत्यंत संघर्षमय जीवन जगले. त्यातून आलेल्या अनुभवातून सहकार, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात यश मिळवले. कोणत्याही पदाची अपेक्षा न …

Read More »