Monday , April 20 2026
Breaking News

आरसीबीवर मोठी कारवाई, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल

Spread the love

 

बेंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या २४ तासांनंतर कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजर), कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या विरोधात क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कलम १०५, १२५ (१) (२), १३२, १२१/१, १९० आर/डब्ल्यू ३ (५) या कलमाचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. निष्काळजीपणामुळे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांना जीव गमावावा लागला असा आरोप केला जात आहे.

३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर संघाची विजयी मिरवणूक होणे अपेक्षित होते. ४ जूनला सकाळी रस्त्यावर लोक जमू लागले. गर्दीचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी मिरवणूकीसाठीची परवानगी नाकारली. हा विजयोत्सव पुढे ढकलण्याची विनंती पोलिसांनी केली. रविवारी ८ जून रोजी कार्यक्रम व्हावा असे पोलिसांनी सुचवले होते.
परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परततील असा युक्तिवाद आरसीबीने केला. ४ जून रोजीच हा विजयोत्सव व्हावा असे त्यांचे मत होते. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पोलीस आयुक्त बी दयानंद यांना चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीत सामील होण्याबाबतची नोटीस बजावण्यात आल्याचे बंगळुरू शहराचे उपायुक्त जी जगदीश यांनी दिली आहे.

बुधवारी (४ जून) झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणी पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गर्दीत गोंधळ झाला. चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांना त्यांचा जीव गमावावा लागला. ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. आयोगाने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना नोटीस पाठवून एका आठवड्याच्या आत अहवाल मागवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *