Monday , September 21 2026
Breaking News

अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्येला आळा घालण्याची मागणी हिंदु संघटनांची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या सातत्याने व बिनबोभाट सुरू आहे. कर्नाटक जनावरे हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयक कायदा आणि शासनाचे आदेश असतानाही, त्यांची सर्रासपणे पायमल्ली करून गोहत्या सुरू आहे.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संघटनेचे प्रमुख विजय जाधव म्हणाले, हिंदू परंपरेनुसार गायीला ३३ कोटी देवतांच्या समान मानून तिची पूजा आणि आराधना करण्याची आपली संस्कृती आहे. गोहत्येमुळे केवळ नुकसानच होत नाही, तर आमच्या अस्मितेलाही धक्का लागतो आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. जिल्हा प्रशासनाने पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि इतर संबंधित विभागांना अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी आणखी मागणी केली की, जिल्ह्यातील प्रमुख केंद्रांवर पोलीस विभागाने तपासणी नाके उभारावेत. तसेच, येत्या १२ जूनपर्यंत गोमांस विक्री आणि जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्याचा आदेश जारी करावा. कायद्यानुसार गोरक्षकांना सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य मिळावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *