Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

‘टाऊन प्लॅनिंग’ इमारत मंजुरीसाठी प्रयत्न करणार

  अध्यक्ष निकु पाटील यांची माहिती; शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : ‘टाऊन प्लॅनिंग’ अध्यक्ष पदाची १५ मार्चला घोषणा झाली होती. पण लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे बैठक झाली नाही. शुक्रवारी (ता.२१) बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सध्याचे कार्यालय भाड्याचे इमारतीपासून लवकरच स्वतःची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती …

Read More »

दि. विनर्स सौहार्द सोसायटी जांबोटी, शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

  खानापूर : दि. विनर्स सौहार्द सोसायटी नियमित, जांबोटी या संस्थेचे दि. 20 जून रोजी उद्घाटन संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष व चेअरमन श्री. सुरेश गंभीर व त्यांच्या पत्नी सौ. संगीता गंभीर यांच्या हस्ते फित कापून या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. दि. विनर्स ग्रुप ही इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारी संस्था …

Read More »

योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर सामूहिक योगाची प्रात्यक्षिके

  खानापूर : विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता दररोज योग करण्याकडे अधिक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासासह इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकतील असे प्रतिपादन हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी …

Read More »

निपाणीतील युवकाचा ‘गाभ’ चित्रपट उद्या प्रदर्शित

  निपाणीच्या सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा; आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणलेला चित्रपट निपाणी (वार्ता) : येथील लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा पहिला पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट ‘गाभ’ हा शुक्रवारी (ता.२१) सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरित्या निवडला गेलेला हा चित्रपट असून तेथे याचा जागतिक प्रिमिअर सुद्धा झाला …

Read More »

सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये पूर्व प्राथमिक शाळेचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये कन्नड व मराठी एलकेजी युकेजी‌‌, पूर्व प्राथमिक शाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी आर. पी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून स्तवनिधी पी. बी. आश्रमचे संचालक महावीर पाटील, सन्मती विद्यामंदिरचे उपाध्यक्ष नेमिनाथ मगदूम, स्तवनिधीचे संचालक प्रदीप पाटील, सन्मतीचे संचालक राजू …

Read More »

सौरमित्र योजनेमधून शेतकऱ्यांना न्याय द्या

  राजू पोवार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सौमित्रच्या वेबसाइटवर सौर शेती पंपांसाठी अनुदानित रकमेवर शेतकऱ्यांना सौर पंपसेट वितरित केले जात आहेत. सौमित्र यांच्या संकेतस्थळावर निपाणी विभागातील सदलगा येथे १४ गावांचा समावेश आहे. या गावांचे फॉर्म न भरल्याने सर्व्हे नंबरमधील हिस्सा नंबर ओपन होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे …

Read More »

हत्या प्रकरणातील नाव लपविण्यासाठी दिले ३० लाख रुपये; अभिनेता दर्शनने दिले स्वेच्छेने निवेदन

  बंगळूर : रेणुकास्वामीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आपले नाव लपवण्यासाठी ३० लाख रुपये दिले होते, असे दुसरा आरोपी अभिनेता दर्शन याने पोलिसांसमोर स्वेच्छेने निवेदन दिले आहे. पोलिस चौकशीत अभिनेता दर्शन उर्फ ​​डी बॉसने स्वेच्छेने जबाब नोंदवला असून खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मी ३० लाख रुपये दिले होते आणि …

Read More »

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ

  बंगळूर : राज्य सरकारने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. अनेक मुदती असूनही, बहुतांश वाहनमालकांनी अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट लावलेल्या नाहीत. यापूर्वी १२ जून संपल्यानंतर ती ४ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आता महत्त्वाची बैठक झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत …

Read More »

कलंकित नीटची फेर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची प्रा. राजन चिकोडे यांची मागणी

  निपाणी (वार्ता) : शिक्षणासारख्या पवित्र असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात पैसे मिळविण्यासाठी पेपर फुटीचे प्रकार होत असलेले पुरावे उपलब्ध होत होत आहेत. ज्या परीक्षेत भ्रष्टाचाराद्वारे ७२० पैकी ७२० गुण ६३ विद्यार्थ्यांना मिळत असतील तर १० वी पासुन १२ वी या तीन वर्षे पासुन नीट परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यावर हा अन्याय आहे. …

Read More »

निपाणी भाग ग्रामीण महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांची निवड

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती (ग्रामीण) निपाणी, जिल्हा बेळगाव, कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाचे कार्याध्यक्ष अजित गणू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. निपाणी मतदारसंघामध्ये अजित पाटील यांनी युवा समिती कार्याध्यक्ष पदाला न्याय देण्याचे योग्य काम केले आहे. अध्यक्षपदी बंडा तुकाराम पाटील-मतीवडे, कार्याध्यक्षपदी …

Read More »