Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे

माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत डिजिटल मतदार नोंदणी कार्यक्रम निपाणी(वार्ता) : राज्यात निवडणूकांचे वारे वाहू लागले असून भाजपा सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. जनहिताच्या विरोधात सुरू असलेल्या कामकाजामुळे विद्यमान भाजपा सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना अखेर गुजरात राज्याबरोबरच कर्नाटकातही निवडणूका लागण्याची शक्यत आहे. पक्षाच्या सर्व …

Read More »

हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

बेळगाव : शिक्षणामुळेच आपल्याला खरी ओळख मिळते त्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेणे गरजेचे असून दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. त्यामुळे परीक्षेला चांगल्या प्रकारे सामोरे जा, असे प्रतिपादन मेरडा येथील मराठी शाळेतील सह शिक्षक एल. आय. देसाई यांनी केले. हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ …

Read More »

हिजाब संदर्भात उद्या मुस्लीम संघटनांकडून ‘कर्नाटक बंद’ची हाक

बेंगळुरू : हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत खेद व्यक्त करण्यासाठी राज्यातील विविध मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी उद्या गुरुवार दि. 17 मार्च रोजी ‘कर्नाटक बंद’ पुकारला आहे. बेळगावच्या अंजुमन इस्लाम आणि उलेमांनी सर्व मुस्लिम बांधवांना उद्या त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकातील मुस्लिम संघटनांनी संयुक्तरीत्या …

Read More »

१८ भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर एसीबी छापे

७५ ठिकाणी शोध मोहीम, अनधिकृत मिळकत, कागदपत्रे ताब्यात बंगळूर : लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) ने बुधवारी राज्यातील सर्वात मोठी कारवाई सुरू केली आणि कथित बेहिशोबी मालमत्ता (डीए) प्रकरणी १८ अधिकाऱ्यांवर छापे टाकले. अतिरिक्त महासंचालक, एसीबी, सीमांत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, एसीबीच्या १०० अधिकाऱ्यांचे पथक ३०० कर्मचाऱ्यांसह ७५ ठिकाणी शोध घेत आहेत. …

Read More »

बेळगांव जिल्हा गोंधळी समाज अध्यक्षपदी संदिप गोंधळी यांची निवड

संकेश्वर (प्रतिनिधी) : नुकतीच गोकाक माऊराई देवस्थान सभाभवनमध्ये अखिल कर्नाटक गोंधळी समाजाची सभा घेऊन त्यात नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान अखिल कर्नाटक गोंधळी समाजाचे राज्याध्यक्ष विठ्ठल गणाचार्य यांनी भूषविले होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सभा घेऊन बेळगांव जिल्हा गोंधळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बेळगांव जिल्हा गौरवाध्यक्षपदी सिध्दप्पा इंगवे तर …

Read More »

निलावडे ग्रा. पं. हद्दीतील आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण माजी एमएलसी विवेकराव पाटील यांच्या फंडातून पाच लाख रुपये खर्चून करण्यात आला. यासाठी निलावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर व माजी ग्राम पंचायत सदस्य ओमाणी पाटील यांच्या प्रयत्नाने या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिमेंट काँक्रीट …

Read More »

खानापूर शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईईचे होणार मार्गदर्शन

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी संचालित शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईई मार्गदर्शनाची सोय होणार आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी दिली. खानापूर येथील शांतिनिकेतन काॅलेजात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सचिव प्रा. आर. एस. पाटील म्हणाले की, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेना सामोरे जाण्यासाठी अकरावी, बारावीपासून गुणात्मकतेला प्राधान्य देणे …

Read More »

आम आदमी पार्टीचे कम्प्युटर उतारासंदर्भात खानापूर तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून कम्प्युटर उताऱ्यासंदर्भात नेहमीच शेतकरीवर्गाना, सामान्य नागरिकांना आडचण होत आहे. कम्प्युटर उतारा मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढताना, शेतीच्या कामासाठी कॅप्यूटर उतारा वेळेत मिळत नाही. त्यामुळे सर्व जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने …

Read More »

संकेश्वरात मुलांचा शिमगा चालू…

संकेश्वर (प्रतिनिधी) : उद्या गुरुवार दि. १७ रोजी हुताशनी पौर्णिमा होळी असल्यामुळे आज संकेश्वरात मुले-मुली युवक सार्वजनिक होळीसाठी टिमक्यांच्या निनादात घरोघरी जाऊन शिमगा करीत शेणकूट लाकडे, सरपण आणि देणगी गोळा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी कुटुंबातील घरांत शेणकूट, सरपण तर मोजक्याच घरांत लाकडे सार्वजनिक होळीसाठी मिळताना दिसली. प्रत्येकाच्या घरात आज …

Read More »

योग करा निरोगी राहा : अमर नलवडे

संकेश्वर (प्रतिनिधी) : योग-प्राणायम करा, निरोगी राहा, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी सांगितले. ते संकेश्वर साई भवन येथे ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन करुन बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांनी भूषविले होते. …

Read More »