Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

सद्गुरुंचे सानिध्य लाभल्यास अंतरबाह्य सार्थक मिळते!

प. पू. महेशानंद स्वामीजी यांचे प्रतिपादन कोगनोळी : मानवी जीवनाचे अंतरबाह्य सार्थक हे सद्गुरुंच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे मिळते असे विचार प. पू. महेशानंद स्वामीजी यांनी व्यक्त केले. हंचिनाळ के. एस. (ता. निपाणी) येथील प. पू. ईश्वर स्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित प्रवचन सोहळ्यामध्ये संतांचे जीवन चरित्र या विषयावर पाचवे …

Read More »

सौंदलगा येथे पावसामुळे निवारा पडल्यामुळे एक म्हैस दगावली

सौंदलगा : सौंदलगा येथे शेतात बांधलेल्या जनावरांचा निवारा पडून संदीप रवींद्र पाटील यांची म्हैस दगावली. सौंदलगा येथील शेतकरी संदीप पाटील यांनी शेतात जनावरांसाठी अड्डा केला होता. मात्र दोन दिवस जोरात झालेल्या पावसामुळे बांधलेला निवारा पडल्यामुळे एक म्हैस दगावली असून बाकीच्या एक म्हैस व दोन रेडके जखमी झाले आहेत. या पडलेल्या …

Read More »

खानापूर मराठी मुलींच्या शाळेचे शिक्षक सुतार यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेचे शिक्षक एन. जे. सुतार हे 36 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून नुकताच निवृत्त झाले. यानिमित्ताने शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शिक्षक संयोजक क्रांती पाटील, एसडीएमसी अध्यक्ष परशराम गुरव, उपाध्यक्षा शितल गुरव, सदस्य जोतिबा गुरव, शिवाजी गोंधळी, संजू …

Read More »

अमरनाथमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांना वाचवण्यासाठी उपाय : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुर : अमरनाथ यात्रेत राज्यातील 100 हून अधिक कन्नडिग सहभागी झाले असून ते सुरक्षित आहेत. आम्ही तिथल्या राज्य सरकारच्या सतत संपर्कात आहोत आणि बचावकार्य सुरू आहे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमधील त्यांच्या आरटी नगर निवासस्थानी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटीमुळे 15 लोकांचा …

Read More »

वडिलांच्या बाराव्या दिवशी राबवले विविध स्तुत्य उपक्रम

कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील कैलासवासी विठ्ठल ज्ञानू राजगुडे  वय 79 वर्षे यांच्या निधनानंतर बाराव्या दिवशी पारंपारिक पद्धतीना फाटा देत गावातील सुमारे शंभर वारकऱ्यांना ज्ञानेश्वरीचे वाटप केले. मराठी शाळेतील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचे वाटप केले. तसेच मतिवडे येथील भारतीय सेवा आश्रमास ब्लॅंकेट भेट व खाऊचे वाटप करून …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार बूट, सॉक्सचे दोन जोड

कॉंग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा, १३२ कोटी अनुदान मंजूर बंगळूर : सरकार सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शूज आणि मोज्यांचे दोन जोड वितरित करेल, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी जाहीर केले. सरकारने विद्यार्थ्यांना अद्याप बूट, सॉक्स वितरित केले नसल्याबद्दल कॉंग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हा निर्णय जाहीर केला. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात …

Read More »

दोस्ताने ब्लेडने दोस्तांचा गळा चिरला

चिल्लर पैशांच्या व्यवहारातून प्राणघातक हल्ला संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता वडर गल्लीत दोस्तांने ब्लेडने दोघा दोस्तांचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. ब्लेडने गळा चिरल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे …

Read More »

काय शाळा, काय ग्राऊंड….

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड-मराठी शाळेची दुरावस्था झालेली दिसत आहे. शाळेतील गळक्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट शाळेत प्रवेश करु लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक ठिक-ठिकाणी बादल्या ठेवून त्यावर कसाबसा तोडगा काढण्याचा …

Read More »

चिक्कोडी तालुक्यातील 4 बंधारे पाण्याखाली

चिक्कोडी : महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील 4 पूल पाण्याखाली बुडाले आहेत. महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत आहे. त्याशिवाय यडूर-कल्लोळ, मांजरी-सौंदत्ती, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दानवाड हे 4 …

Read More »

स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस प्रमुखांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस प्रमुख संजीव पाटील यांचा येथील कर्नाटक राज्य स्वराज्य रक्षक प्रतिष्ठान यांच्यामार्फत स्वराज्य रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी निपाणी भागातील कायदा व सुव्यवस्था आणखीन सुरळीत करण्याची विनंती केली. त्यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष उत्तम कामते, उपाध्यक्ष विजय कामते, …

Read More »