Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

…प्रसंगी अन्य निधी रोखा परंतु शेतकरी आणि मजुरांचे पैसे अदा करा

बी. एस. येडियुराप्पा यांचा सरकारला घरचा आहेर बेळगाव (वार्ता) : संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि मजूर हवालदिल झाले आहेत. अशावेळी प्रसंगी विकासकामांचा निधी रोखावा. शेतकरी आणि मजुरांना तात्काळ पैसे अदा करावेत, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बुधवारी विधान सभेत बोलताना …

Read More »

बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत जारकीहोळी जिंकले.. भाजप हरले..

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत खर्‍या अर्थाने जारकीहोळी जिंकले, भाजप हरले असेच म्हणावे लागेल. जारकीहोळी बंधुंनी पुन्हा एकदा आपली ताकद राज्यातील सत्तारुढ सरकारला दाखवून दिली आहे भाजपाने जारकीहोळी यांना विधानपरिषदची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषदच्या आखाड्यात अपक्ष …

Read More »

खानापूरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी बेळगांव येथे महामेळाव्याच्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करत त्यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. याचे पडसाड सीमाभागात पसरले असून मंगळवारी खानापूर शहरासह तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले. मंगळवारी पहाटेपासून शहरात बंदचे वारे वाहू लागले. सकाळी आठ वाजल्यापासून खानापूर …

Read More »

बेळगाव बंदच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथे पोलिस बंदोबस्त कडक

कोगनोळी : बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या लोकांनी शाही फेक केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्‍या कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या शिवसेना व अन्य राजकीय लोकांच्यावर कडक लक्ष देण्यासाठी मोठा पोलिस …

Read More »

आज होणार विधानपरिषदेचा निकाल जाहीर

बेळगाव (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणूक निकालाची क्षणगणांना सुरू झाल्याने निकालाचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिलेले दिसताहे. बेळगांव जिल्ह्यातून दोघे उमेदवार विधानपरिषद सदस्य म्हणून नव्याने निवडले जाणार आहेत. ही संधी कोणाला मिळणार याविषयी जो-तो आपआपला अंदाज वर्तविताना दिसत आहे. बेळगांव जिल्ह्यत भाजपाचे 13 आमदार त्यात दोघे मंत्री, दोन खासदार, एक राज्यसभा सदस्य …

Read More »

सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित

काकासाहेब पाटील : लेफ्टनंट रोहित कामात यांचा सत्कार निपाणी : पूर्वीच्याकाळी सैन्यदलात भरती होण्यासाठी युवकांचा ओढा कमी होता. पण अलीकडच्या दहा वर्षाच्या काळात देशाच्या संरक्षणासाठी युवक मोठ्या प्रमाणात सरसावत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. देशाच्या संरक्षणामध्ये सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लेफ्टनंट रोहित कामत यांच्या निवडीमुळे निपाणीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला …

Read More »

कर्नाटक सीमेवर शिवसेनेचे विजय देवणे यांना रोखले

कोगनोळी : बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने टिळकवाडी येथे आयोजित महामेळाव्यास महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांची गाडी कोगनोळी येथील टोलनाक्यावर अडवण्यात आले आहे. महाराष्ट्र इथून बेळगाव येथील या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेतेमंडळी जाणार असल्याची माहिती मिळताच कर्नाटक पोलीस प्रशासनाच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल

तिन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज निपाणी : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.13) पाचव्या दिवशी तिन्ही गटाकडून एकूण 12 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. गेल्या 8 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू असताना देखील तिन्ही ही गटाकडून आज सोमवार (ता. 13) रोजी पाचव्या दिवशी या ठिकाणी …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य आमदारांची दांडी

224 पैकी केवळ 80 आमदारच उपस्थित बेळगाव : 2 वर्षांनंतर बेळगावात आज सोमवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ झाला. 10 दिवसीय अधिवेशनाची सर्व जय्यत तयारी प्रशासनाने केली. हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, मंत्री आणि आमदार बेळगावात दाखल झाले. विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या आणि विरोधी सदस्यांनी हजेरी लावली. मात्र पहिल्या दिवशीच्या कामकाजाप्रसंगी बहुतांश …

Read More »

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावचे सुवर्ण विधानसौध सज्ज

बेळगाव :   तब्बल दोन वर्षानंतर बेळगावच्या हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवार दिनांक 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची धास्ती घेत काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीत बेळगावात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. महामारीच्या काळातील हे …

Read More »