बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) या सर्वात कठीण परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. कलखांब गावचा सुपुत्र राहुल जयवंत पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 224 वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. राहुल …
Read More »रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी दूषित होत आहे. परिणाम जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याबरोबरच या भागात पाण्याचे दुर्भिक्ष भासू लागले असून प्रशासनाने ड्रेनेज मिश्रित पाण्याची गंभीर समस्या त्वरेने निकालात काढावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. रयत गल्ली, वडगाव येथील …
Read More »एमएसएमई नोंदणीकृत व्यापाऱ्यांना दंडातून सवलत देण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून व्यावसायिक परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या मुद्द्यावर बुधवारी ‘द बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन’ आणि ‘ट्रेडर्स कौन्सिल’च्या शिष्टमंडळाने महापौर आणि उपमहापौरांची भेट घेत निवेदन सादर केले. सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सुमारे दीड तास चर्चा करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. महानगरपालिका आयुक्तांना उद्देशून देण्यात आलेल्या या …
Read More »अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी
बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. ऋतेश अनिल भोसले (वय २२, रा. कंग्राळी बुद्रुक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२५ मध्ये ही …
Read More »दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश
बेळगाव : बेळगाव येथील मराठा कॉलनीतील रहिवासी निर्मला मिलिंद सावंत यांनी ४ मार्च रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणाचा तातडीने तपास करत कॅम्प पोलिसांनी निपाणी येथील एका महिलेला अटक केली …
Read More »मारीहाळ पोलिसांच्या कारवाईत आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश
बेळगाव : मारीहाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ९५ लाख ५० हजार रुपये किमतीची एकूण २१ वाहने जप्त केली आहेत. शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मारीहाळ हद्दीतील निलजी क्रॉस येथून २७ …
Read More »बेळगाव शहर उपनगरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित
बेळगाव : बेळगाव शहरातील श्रीनगर आणि सुवर्णसौध या महत्त्वाच्या विद्युत उपकेंद्रांमध्ये चौथ्या त्रैमासिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे येत्या रविवारी (८ मार्च) शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती हेस्कॉमने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हुबळी विद्युत पुरवठा कंपनीच्या शहर विभागाने …
Read More »राज्याचा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा : भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला असून महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ठोस व दीर्घकालीन योजना या अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसत नाहीत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली …
Read More »युवा समितीतर्फे 15 मार्च रोजी ‘इथे ओशाळाला मृत्यू’ नाट्यप्रयोग
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यातर्फे शिवगणेश प्रोडक्शन्स सिंधुदुर्ग, मुंबई निर्मित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची धगधगती शौर्यगाथा असलेल्या नाटकाचा प्रयोग येत्या रविवार दि. 15 मार्च 2026 रोजी दुपारी 3 आणि सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे. उपरोक्त ऐतिहासिक नाटक बेळगाव शहरातील कोनवाळ …
Read More »कडोलीत उद्या मराठी भाषा गौरव दिवस
कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिवस (कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस) साजरा करण्यात येणार आहे. मराठी साहित्य संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कडोलीतील श्री शिवाजी हायस्कुलच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. एस. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta