Sunday , September 8 2024
Breaking News

बेळगाव

सीमाप्रश्न आणि सीमावासीयांवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडा

  महाराष्ट्र एकीकरण समितीची नितीन बानुगडे पाटील यांच्याकडे मागणी बेळगाव : १४ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमानिमित्त बेळगावात आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते प्रा. श्री. नितीन बानगुडे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्नी निवेदन देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने मागणी केली. निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सीमावासीय गेली ७० वर्षे …

Read More »

वाघ आणि बिबट्या गावात आल्याचा व्हिडीओ एडिट करून अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कोंडुसकोप्पजवळील यरमाळ गावात वाघ आणि बिबट्या गावात आल्याचा व्हिडीओ एडिट करून अफवा पसरवणाऱ्या दोघांना माहिती वन अधिकाऱ्यांनी अटक केली. बेळगाव शहरात बिबट्या, हत्ती आणि जंगली प्राणी वारंवार दिसू लागले असून त्याचा लोकांना त्रास होत आहे. वाघ शेतात पळत असल्याचा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या …

Read More »

बेळगाव जिल्हा विभाजनाची प्रतीक्षा करावी : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगाव उत्तर जिल्ह्याची निर्मिती माझ्या हातात नाही, सरकारने ठरवायचे आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले होते. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यातील सर्व विभागांना अनुदान वाटप करण्यात आले आहे, शिक्षण, रोजगार या विषयांना उच्च प्राधान्य देण्यात आले असून चार वर्षे आमचे सरकार …

Read More »

हेल्मेटबाबत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली बुलेटवरून जनजागृती

  बेळगाव : बेळगावात जिल्हास्तरीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अभिनवपणे हेल्मेट जनजागृती केली. 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर आज बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुलेट चालवून, हेल्मेट परिधान करून शहरात हेल्मेट जनजागृती केली. हेल्मेट घातल्याने दुचाकीस्वार अपघाताच्या वेळी स्वत:चे …

Read More »

खादरवाडी येथील शेतकरी पुन्हा आक्रमक; उताऱ्यावर नावे लावून देण्याची मागणी

  बेळगाव : खादरवाडी येथील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर त्यांची नावे लावून देण्यात यावी अन्यथा प्रशासनाने सामूहिक आत्महत्या करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात एका निवेदनाद्वारे केली. खादरवाडी येथील शेतकऱ्यांची 115 एकर संयुक्तिक वडिलोपार्जित जमीन आहे. या शेतजमिनीच्या उताऱ्यावर सर्व शेतकऱ्यांची नावे नोंदविणे शक्य नसल्यामुळे तत्कालीन कुरुंदवाड संस्थानाने …

Read More »

रेल्वे स्थानकावर कर्नाटक दलित संघर्ष समितीचे आंदोलन

  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकासमोर डॉ. बी. आर. आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बी. आर. आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी विविध दलित संघटनांनी कर्नाटक दलित संघर्ष समिती आणि रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकावर निदर्शने …

Read More »

शालेय विद्यार्थिनींना जायंट्सतर्फे शूजचे वितरण

  बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन)च्या वतीने आज गोवावेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनीना शूज वितरणाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जायंट्सचे अध्यक्ष अविनाश पाटील, संजय पाटील, लक्ष्मण शिंदे, शिवराज पाटील, विजय बनसुर, यल्लाप्पा पाटील, मधु बेळगावकर, विश्वास पवार, भरत गावडे, मोहन पत्तार, दिगंबर किल्लेकर इत्यादी हजर होते. …

Read More »

कपडे धुण्यासाठी धरणावर गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

  बेळगाव : कपडे धुण्यासाठी धरणावर गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास खादरवाडी येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव सुनीता सोमनाथ पाटील (वय ५०) असे असून या महिलेच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. मिळालेली अधिक माहिती अशी …

Read More »

कोलकाता येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचे बेळगावात आंदोलन

  बेळगाव : कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला पदव्युत्तर प्रशिक्षण (पीजीटी) डॉक्टरच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी एक भव्य निषेध रॅली काढली. कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर केवळ बलात्कारच नाही तर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. क्रूर राक्षसी वर्तन करणाऱ्या आरोपींना …

Read More »

संगोळी रायण्णा पुतळा वाद : उचगाव येथे आंदोलनासाठी निघालेल्या करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  बेळगाव : क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी गावात आंदोलन करणाऱ्या करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा स्थापन करण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. उद्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांची जयंती असून …

Read More »