Monday , November 23 2026
Breaking News

बेळगाव

साताऱ्यात बेळगाववासीयांचे काळ्या दिनानिमित्त धरणे आंदोलन

    काळ्या फिती लावून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमावासीयांना पाठिंबा सातारा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी १ नोव्हेंबर या काळ्या दिनानिमित्त सातारा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सातारा विभागातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी काळ्या फिती लावून सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा …

Read More »

सीमावासीयांच्या समर्थनार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

  बेळगावसह ८६५ गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी; पुणेकरांचा सीमालढ्याला पाठिंबा पुणे : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील ८६५ गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा, या मागणीसाठी तसेच १ नोव्हेंबर रोजी सीमाभागात पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते …

Read More »

काळ्या दिनी मराठी भाषिकांचा एल्गार!

    बेळगाव : महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार, हातात काळे झेंडे आणि मनात सीमाप्रश्नाची धग घेऊन हजारो मराठी भाषिक काळ्या दिनी रस्त्यांवर उतरले. १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सायकल फेरीतून मराठी भाषिकांनी आपल्या एकजुटीचे जोरदार प्रदर्शन केले. सात दशकांनंतरही सीमाप्रश्नाची धग कायम असून, महाराष्ट्रात विलिनीकरणाची मागणी …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक, भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई यांचे निधन

  बेळगाव : ज्येष्ठ साहित्यिक, कवी, शिक्षणतज्ज्ञ आणि भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई यांचे रविवार, १ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कन्नड साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. देसाई यांचा जन्म ३ एप्रिल १९३३ रोजी धारवाड जिल्ह्यातील अम्मिनभावी …

Read More »

समृद्धी महामार्गावर घुमल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा

बेळगाव : आपण कुठेही असलो तरी सीमाप्रश्नाचा लढा सक्रियपणे सुरूच राहील आणि संयुक्त महाराष्ट्र हेच आमचे अंतिम ध्येय आहे, याचा प्रत्यय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज दिला. मागील काही दिवसांपासून समितीचे कार्यकर्ते सहपरिवार सहलीसाठी बाहेर गेले आहेत. आज प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर थांबून त्यांनी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा दिल्या. सहलीच्या …

Read More »

काळ्या दिनाच्या सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा : बेळगाव तालुका म. ए. समितीचे आवाहन

बेळगाव : भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगाव, कारवार आणि बिदर येथील मराठी भाषिक प्रदेश तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस सीमा भागात काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यंदाही रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

मोटारीचे बक्षीस अन् २५.८० लाखांचे आमिष; एक लाखाची ऑनलाइन फसवणूक!

  हर्बल लाईफ कंपनीच्या नावाने बनावट पत्र पाठवून गोकाक तालुक्यातील व्यक्तीला गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल बेळगाव : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत असतानाही नागरिकांची फसवणूक होण्याचे सत्र सुरूच आहे. पोलिसांकडून वारंवार जनजागृती करूनही आमिषांना बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. असाच प्रकार गोकाक तालुक्यातील मेळवंकी येथे उघडकीस …

Read More »

खडेबाजार श्री हनुमान मंदिराचा कळसारोहण उत्साहात

  बेळगाव : श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ (ट्रस्ट) संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, बेळगांव यांच्यावतीने खडेबाजार, बेळगांव संयुक्त महाराष्ट्र चौकातील जागृत देवस्थान असलेले श्री मारुती मंदिराचे नूतनीकरणनिमित्त आज शुक्रवार रोजी कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला.शुक्रवार सकाळी ७ ते ११ या वेळेत वासुदेव पांडुरंग छत्रे, गणेश चिंतामणी …

Read More »

महात्मा गांधी संस्थेला तीनशे पुस्तके भेट

    कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेला बेळगाव मधील मराठी भाषा प्रेमी नवसाहित्य पुस्तकालयाचे मालक शेषकुमार जवळकर यांनी तीनशे पुस्तके भेट दिली. महात्मा गांधी संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या कडे तीनशे पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सहकार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो -खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड

  बेळगाव : पदवीपूर्व (प्री.) युनिव्हर्सिटी कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या वैष्णवी कोवाडकर, ऐश्वर्या कंग्राळकर, स्नेहा हिरोजी, साक्षी पाटील व प्रेरणा मुतगेकर या पाच खेळाडूंची बेंगलोर येथे होणाऱ्या पदवी पूर्व राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भैरीदेवकोप्प, धारवाड येथे झालेल्या राष्ट्रीय महिला सीनियर …

Read More »