येळ्ळूर : मंगळवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे येळ्ळूर परिसरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड आणि विजेचे खांब मुख्य रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेत काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश …
Read More »उन्हाच्या तडाख्यात बेळगावकरांना ‘कुलिंग शेड’चा दिलासा
राणी चन्नम्मा चौकात जिल्हा प्रशासनाकडून सावलीची सोय बेळगाव : सिग्नलवर उभे राहून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राणी चन्नम्मा चौकात उभारलेले ‘कुलिंग शेड’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्येही नागरिकांना थोडासा थंडावा देणारा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका आयुक्त …
Read More »ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून बैलहोंगल तालुक्यात बालकाचा मृत्यू
बैलहोंगल : ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसून प्रवास करत असलेल्या बालकाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील मास्तमर्डी गावात घडली. ट्रॅक्टरला नांगर जोडून नेत असताना इंजिनवर बसलेला मनोज बसवराज मिचिडोळी (वय 13 वर्षे) हा लहान मुलगा अचानक तोल जाऊन ट्रॅक्टरखाली पडला. त्यानंतर तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »सामाजिक आणि धार्मिक सलोख्यासाठी सहकार्य करा : पोलीस आयुक्त बोरसे यांचे आवाहन
बेळगाव : समाजाच्या हितासाठी, जातीय सलोखा वाढवण्यासाठी आणि सोशल मीडियाचा गैरवापर, अमली पदार्थांचे सेवन, जुगार व किरकोळ गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणां विरोधात जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि नागरी प्रशासनासोबत मिळून काम करा असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना केले. अल्पसंख्याकांसाठी पंतप्रधानांच्या १५-कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या जिल्हा …
Read More »धोकादायक कपिलेश्वर विहिरीची हस्तांतरण प्रक्रिया लवकर पूर्ण करून विकास करा : युवा समिती सीमाभागच्या वतीने प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
बेळगाव : रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील विहिरीत एक दुर्घटना घडली, त्यामध्ये पोहायला गेलेल्या दोन 7 व 10 वर्षे वय असलेल्या चिमुकल्यांचा कठडा कोसळून बळी गेला. या जीर्ण झालेल्या विहिरीत अनेकजण आत्महत्याही करतात व काही निष्पापांचे बळीही जात आहेत, नागरिकांतून प्रश्न विचारला जात आहे की …
Read More »किरण जाधव यांनी घेतली श्रीलक्ष्मी देवीचे दर्शन; लोककल्याणार्थ प्रार्थना करून रयतेच्या हितासाठी घातले देवीकडे साकडे
बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आज कंग्राळी बुद्रुक येथे जाऊन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले श्री लक्ष्मी देवी समोर नारळ ओटी ठेवून देवीचा शुभ आशीर्वाद घेतला. लोककल्याणार्थ प्रार्थना करून सर्व समाजाला सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव. समाजातील दुष्ट शक्तींचा न्हायनाट कर, …
Read More »हंगरगा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; संपूर्ण संसार भस्म
बेळगाव : हंगरगा (ता. जि. बेळगाव) गावातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत गृहपयोगी साहित्यसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आगीच्या भक्षस्थानी पडलेले घर राजू भरमा पाटील यांच्या मालकीचे असून घडलेल्या दुर्घटनेमुळे त्यांची आयुष्यभराची कमाई जळून खाक झाली आहे. आगीत पाटील यांनी विशेषतः आपल्या …
Read More »जितो बेळगाव वतीने दोन दिवसीय हर्षोत्सव कार्यक्रमाचे आयोजन : हर्षवर्धन इंचळ
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, जितो बेळगाव संस्थेच्या वतीने आणि जितो केकेजी झोनच्या सहकार्याने बेळगाव 9 आणि 10 मे रोजी जितो हर्षोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती, जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचळ यांनी आज मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना संस्थेचे व्हाईस चेअरमन …
Read More »कौटुंबिक वादातून जावयाकडून सासूवर चाकू हल्ला
बेळगाव : सौन्दत्ती तालुक्याच्या अलडकट्टी गावात कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी व्यक्तीची ओळख महादेवी करीगार (४५) अशी पटली असून, पोलिसांनी आरोपी जावई अरविंद गवळी (२६) याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महादेवी यांच्या मुलीचे लग्न …
Read More »आज पुन्हा कोसळला कपिलेश्वर विहिरीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग; विहिर परिसर सील
बेळगाव : शहरातील कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक विहिरीची अवस्था अतिशय धोकादायक बनली आहे. रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी पुन्हा विहिरीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी परिसरात कोणीही उपस्थित नसल्याने दुर्घटना टळली. रविवारी सकाळी शिवम आणि परशुराम ही पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पोहून झाल्यावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta