बेळगाव : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक आकाश कंदील व विद्यार्थ्यांच्या लेखणीतून साकारलेल्या दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे …
Read More »उडुपीतील शरीरसौष्ठव स्पर्धेत शहाबुद्दीनने पटकावले प्रथम पारितोषिक!
एक लाख रुपये आणि चार फूट उंचीचा आकर्षक चषक; २०० स्पर्धकांचा सहभाग उडुपी (वार्ता) : उडुपी येथील अलांकुर गावात आयोजित भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत शहाबुद्दीन याने उत्कृष्ट शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. त्याला रोख एक लाख रुपये आणि चार फूट उंचीचा आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तब्बल …
Read More »शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वकिलांचे कामकाज बंद
चुन्नप्पा पुजारी यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राणी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने बेळगाव : ऊस उत्पादकांच्या आंदोलनादरम्यान शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगावातील वकिलांनी कामकाज बंद ठेवून आंदोलन केले. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे एकत्र आलेल्या वकिलांनी सरकार आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार …
Read More »मुडलगी दरोडा प्रकरणाचा छडा; सात जणांना अटक
२ कोटी ३९ लाखांची रोकड जप्त; आणखी दोघे फरार – जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांची माहिती बेळगाव : मुडलगी येथे २ कोटी ६८ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याच्या प्रकरणाचा मुडलगी पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ कोटी ३९ लाख रुपये रोख रक्कम जप्त …
Read More »रेशनच्या तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी धडक मोहीम
राज्यभरात 17.78 लाख किलो तांदूळ जप्त; बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख किलो तांदळाचा समावेश बेळगाव : रेशनवरील तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत बेकायदेशीर वाहतूक, साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तब्बल 17.78 लाख किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. यामध्ये …
Read More »चून्नाप्पा पुजारींसह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात!
मुक्तिमठ परिसरात शेतकरी आणि पोलिसांत जोरदार वादावादी; जैन आंदोलनाला पोलिसांचा अडथळा बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या हिंडलगा जेल भरो आंदोलनाला पोलिसांनी अटकाव केला. भुतरामनहट्टी येथील मुक्तिमठ परिसरात शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी नेते चून्नाप्पा पुजारी …
Read More »बेळगाव जिल्ह्यात उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित!
कारखानदार आणि शेतकरी नेत्यांची सहमती बेळगाव : ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी प्रतिटन उसाला ३,६०० रुपये दर देण्यास सहमती दर्शविल्याची घोषणा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. शेतकरी नेते चूनाप्पा पुजारी …
Read More »शेतकऱ्यांच्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात जमावबंदी
५ नोव्हेंबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू; पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचा आदेश बेळगाव : ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ७ …
Read More »दूध दरवाढ आणि बस भाडेवाढीवरून डॉ. सोनाली सरनोबत यांची काँग्रेस सरकारवर टीका
दरवाढीचे निर्णय मागे घेण्याची मागणी बेळगाव : राज्यात दुष्काळ आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटाचा सामना करत असताना काँग्रेस सरकारने दूध दरवाढ आणि बस प्रवास भाडेवाढीचा निर्णय घेऊन जनतेच्या अडचणीत आणखी भर घातली आहे, अशी टीका भाजप महिला मोर्चा कर्नाटकच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. यासंदर्भात …
Read More »दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत चारचाकी वाहनांना बंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा निर्णय; प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स बेळगाव : दीपावली सणाचा उत्साह वाढू लागल्याने शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजू लागल्या आहेत. गुरुवारपासून दीपावली पर्वाला प्रारंभ होत असल्याने बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख बाजारपेठांकडे जाणाऱ्या मार्गांवर चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta