आरोपीला काही तासांत अटक बेळगाव : कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव येथे घरासमोर झोपण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी कित्तूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासांत अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के.रामराजन यांनी …
Read More »बेळगावातील नाले सफाईसाठी १ कोटी ५ लाखांची तरतूद; दोन ठेकेदार ही नियुक्त
बेळगाव – बेळगाव शहरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नाले सफाईच्या कामाला गती दिली आहे. तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चातून हाती घेण्यात येणाऱ्या या कामासाठी दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात त्यांना कार्यादेश देण्यात येणार आहेत. कार्यादेश मिळाल्या नंतर शहरातील …
Read More »बेळगावात २ दिवस राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : बेलगाम डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन यआणि कर्नाटक स्टेट ब्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव ९ आणि १० मे रोजी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू यांनी आज गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. स्पर्धेविषयी अधिक …
Read More »‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून दुचाकी वाहनांची तपासणी : तलवार आणि चाकूसह दोघांना अटक
बेळगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांच्या ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पथकाकडून दुचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे. या कारवाईदरम्यान या पथकाने बेकायदेशीररीत्या तलवार आणि चाकू बाळगणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरभर सुरू असलेल्या या धडक मोहिमेत संशयितांची तपासणी करण्यात …
Read More »कोणतेही राजकारण न आणता कपिलतीर्थ तलावाचा विकास साधणार : आमदार राजू सेठ
बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील कपिलतीर्थ मंदिर तलावात रविवारी दिनांक 3 मे रोजी झालेल्या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू ही दुःखदायक घटना आपल्या परिसरात होणे ही बाब आपल्यासाठी वेदनादायी गोष्ट आहे, ज्या दिवशी घटना घडली मी स्वतः जातिनिशी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून तिथे उपस्थित राहून प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा …
Read More »शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यास जीवन समृद्ध होईल : उद्योगपती शिरीष गोगटे
बेळगाव : “शिवाजी महाराजांच्या सारखा दुसरा राजा झाला नाही आणि होणार नाही. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या तर आपले जीवन समृद्ध होईल” असे विचार उद्योगपती शिरीष गोगटे यांनी व्यक्त केले. गोगटे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला संलग्न विविध आस्थापनामधील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना काल शिवाजी महाराजांच्या जीवनावरील “राजा शिवाजी” हा …
Read More »बेळगावात आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; रिव्हॉल्वर बाळगणाऱ्यासह तीन आरोपी अटकेत
बेळगाव : बेळगाव शहरात आयपीएल सट्टेबाजी रॅकेट उघडकीस आले असून मार्केट पोलिसांनी शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली असून सट्टेबाजी करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. तसेच बेकायदेशीररीत्या रिव्हॉल्वर वापरून दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला देखील मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. आज झालेल्या कारवाईत एकूण तीन जण पोलिसांच्या …
Read More »अवैध कृत्यांविरोधात शहर पोलिसांची तीव्र मोहीम; पाच जणांना अटक
बेळगाव : शहरातील अवैध कृत्यांविरोधात शहर पोलिसांनी तीव्र मोहीम हाती घेतली असून चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र छापे घालून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटका व्यवसाय आणि अमली पदार्थांचे सेवन करीत असणाऱ्या पाच जणांना अटक केली असून विविध पोलीस स्थानकाच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे …
Read More »मराठी घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीसाठी अशीष फाफट शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विज्ञान शाखेतून एक विषय मराठी घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीकडून अशीष फाफट शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. अशीष फाफट हे मूळचे राजस्थानमधील फालोदी येथील आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण चेन्नई आणि हैदराबाद येथे झाले. त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट (CPA) ही …
Read More »रामकृष्ण मिशन आश्रमाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमास 8 मे पासून प्रारंभ
बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दि. ८ ते १० मे दरम्यान किल्ल्यातील आश्रमात करण्यात आले आहे. स्वामीजींनी १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ या कालावधीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta