Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

नो बॅग डे’मध्ये अमली पदार्थांविरोधी जनजागृती; तिसऱ्या शनिवारी शाळांमध्ये विशेष उपक्रम

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या दप्तराचा भार कमी करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ‘नो बॅग डे’ उपक्रम राबविण्यात येतो. जुलै महिन्यातील या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शनिवार, १८ जुलै रोजी होणाऱ्या ‘नो बॅग …

Read More »

क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूंच्यात शिस्त, जिद्द व संघ भावना निर्माण होते : रोहिणी पाटील

    विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा बेळगाव : क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूमध्ये शिस्त, जिद्द, आणि संघ भावना निर्माण होते. बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडाक्षेत्राचा फायदा घेऊन राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्वल करावे व खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रासाठी कठोर मेहनत व सातत्य ठेवण्याचे आव्हान एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय …

Read More »

डॉ. कीर्ती अभय बिर्जे राजीव गांधी युनिव्हर्सिटीत द्वितीय

  बेळगाव : राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सेस बेंगलोर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एमडी परीक्षेचा पदवीदान सोहळा 15 जून रोजी संपन्न झाला. यात शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेल्या डॉ. कीर्ती अभय बिर्जे यांचा राजीव गांधी युनिव्हर्सिटीमध्ये द्वितीय क्रमांक तर शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरमध्ये एमडी अंतिम वर्षात प्रथम …

Read More »

पत्नी -मुलाच्या आत्महत्येप्रकरणी पती अटकेत; इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे तीन वर्षीय मुलासह विवाहितेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पती नागेश तळवार याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रेमा तळवार यांनी तीन वर्षीय मुलगा भुवन याच्यासह आत्महत्या केल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पती नागेश तळवार, सासू सुशीला …

Read More »

युनियन जिमखाना क्लबमध्ये गोळीबाराचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

  बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयालगत असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणात एका व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरेश जाळगार हे क्लबमध्ये रमी खेळत असताना पाच जणांचा एक गट तेथे आला. त्यापैकी तिघांनी क्लबमध्ये …

Read More »

ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात काम करत असताना तुटलेल्या वीजतारेचा स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांची ओळख मुत्तप्पा श्रीशैल मुगळखोड (वय 46) आणि राजेश्वरी मुगळखोड (वय 36) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाम्पत्य ऊसाच्या शेतात तण काढण्याचे काम करत …

Read More »

भंगी रस्ता अखेर स्वच्छ; २५ वर्षांपासूनचा नागरिकांचा प्रश्न मार्गी

  बेळगाव : पांगुळ गल्ली व भातकांडे गल्लीला गणपत गल्लीशी जोडणाऱ्या भंगी रस्त्यावरील सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जुन्या इमारतीचा ढिगारा अखेर हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कामामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघाला. कोसळलेल्या इमारतीचा मलबा रस्त्यावरच पडून असल्याने त्या ठिकाणी कचरा, खराब कपडे आणि …

Read More »

कुद्रेमानी महालक्ष्मी यात्रा २०२८ साली भरविण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

  कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सन २०२८ मध्ये भरविण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत हनुमान मंदिर येथे एकमताने घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यात्रेच्या नियोजनाला सुरूवात झाली आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महालक्ष्मी मंदिराचे अलीकडील काळात नव्याने बांधकाम …

Read More »

ऐतिहासिक निर्णय : ‘जय किसान’ प्रकरणाला उच्च न्यायालयाकडून दिलासा; KAT समोर २७ जुलै रोजी गुणवत्तेवर सुनावणी

  बेळगाव : जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या कायदेशीर लढ्याला आज महत्त्वपूर्ण यश मिळाले. धारवाड येथील माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रकरणातील विलंब माफ करत पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा केला. आज सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता सुरू झालेल्या सुनावणीत जवळपास दीड तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. …

Read More »

एसआयआर मोहिमेचा शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती

    बेळगाव : सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वाढते आव्हान यामध्येच शिक्षकांवर सातत्याने वाढत असलेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध शासकीय सर्वेक्षणे, प्रशासकीय कामे आणि आता विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आल्याने अध्यापनासाठी मिळणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी …

Read More »