Sunday , November 22 2026
Breaking News

ऑनलाइन व्यवहाराच्या नावाखाली तीन कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; तिघांना अटक

Spread the love

 

पाच कोटींचे व्हाइट मनी देण्याचे आमिष; खेळण्यातील नोटा खऱ्या असल्याचे भासविले

बेळगाव : ऑनलाइन आर्थिक व्यवहाराच्या नावाखाली बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बेळगाव सीसीबी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य संशयितांचा सहभागही तपासला जात आहे.

७ नोव्हेंबर रोजी सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर येथे छापा टाकण्यात आला. अशोक मरेप्पा तवनाचे यांच्या घराच्या तळमजल्यावर ही कारवाई करण्यात आली.

मार्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पाच कोटी रुपये व्हाइट मनी स्वरूपात देण्याचे आणि त्याबदल्यात तीन कोटी रुपये ब्लॅक मनी स्वरूपात रोख घेण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू होता.

या प्रकरणी शिवलिंगय्या राजय्या गणाचारी, सागर लक्ष्मण किळकेते आणि विनायक गणपती नोकारे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मुलांच्या खेळण्यातील नोटा खऱ्या असल्याचे भासवून ऑनलाइन पैसे हस्तांतरित करून घेण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाशी संबंधित शिवानंद कल्लाप्पा मुनवळ्ळी याच्यासह संशयितांकडून ३५ हजार रुपये रोख, मोबाईल फोन आणि बनावट बँक स्टेटमेंट जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणूक प्रकरणामागील संपूर्ण टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *