Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेला बॉम्बची धमकी; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

Spread the love

 

ई-मेलद्वारे धमकीचा संदेश; श्वान पथकासह पोलिसांकडून कसून तपासणी

बेळगाव : शहरातील महापालिका कार्यालयाला ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्याने सोमवारी (ता. ९) एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी पाठविलेल्या या धमकीच्या संदेशामुळे महापालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक तातडीने महापालिका कार्यालयात दाखल झाले.

पथकाकडून महापालिकेतील विविध विभाग, कार्यालयीन खोल्या आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे.

दरम्यान, मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कालिमिर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धमकीचा ई-मेल कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठविला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, महापालिका कार्यालयात प्रत्यक्षात कोणतीही स्फोटक वस्तू आढळली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तपासणीनंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *