






बेळगाव : सहकार क्षेत्रातील अग्रेसर मराठा को-ऑप. बँक लि. बेळगांवचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन अनुक्रमे श्री. विश्वनाथ प. हंडे व श्री. विनोद स. हंगीरकर यांचा दि बेळगांव बेकर्स को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी चेअरमन राजाराम सूर्यवंशी होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे ऑडीटर व चार्टर्ड अकौंटंट श्री. एम. डी. चौगुले व त्यांची कन्या चार्टर्ड अकौंटंट गायत्री एम. चौगुले उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सेक्रेटरी सागर शहापूरकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले. माजी सेक्रेटरी श्री. विनायक सायने यांनी प्रास्ताविक करून सत्कारमुतींचा परिचय करून दिला. चेअरमन राजाराम सूर्यवंशी यांनी श्री. विश्वनाथ हंडे, बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव जाधव यांनी श्री. विनोद हंगीरकर, माजी चेअरमन शिवाजी हंगीरकर यांनी श्री. एम. डी. चौगुले व व्हाईस चेअरमन सौ. सुरेखा मेलगे यांनी गायत्री चौगुले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सभेमध्ये सोसायटीचे सल्लागार श्री. नेताजी जाधव यांनी सत्कारमूर्तीना त्याच्या पुढील कार्याकरिता हार्दिक शुभेच्छा देऊन आपले विचार मांडले. श्री. एम. डी. चौगुले यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने सत्कार करून त्याच्या पुढील कार्यकीर्दीला शुभेच्छा देऊन मौलिक मार्गदर्शन केले. सोसायटीचे चेअरमन राजाराम सूर्यवंशी यांनी सोसायटीच्या प्रगती बद्दल माहिती देऊन सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन यापुढेही असेच राहूदे अशी सदिच्छा व्यक्त केली.
सभेस संचालक सर्वश्री. शिवाजीराव जाधव, विजय पाटील, शिवाजी हंगीरकर, शंकर पाटील, शंकर गडकरी, गजानन बसरीकट्टी, श्रीमती. कल्पना पावशे, श्रीमती. रेखा कणबरकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शेवटी श्री. विनायक सायने यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta