Sunday , November 22 2026
Breaking News

जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत समर्थ स्कूलचे चारही संघ अव्वल!

Spread the love

चारही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; खानापूरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव ग्रामीण विभागातर्फे होसवंतमुरी येथील केपीएस स्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शानदार कामगिरी केली. स्पर्धेत शाळेच्या चारही संघांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या विजयामुळे चारही संघांची आगामी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत समर्थ स्कूलच्या खेळाडूंनी सांघिक कौशल्य, उत्कृष्ट समन्वय आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

स्पर्धेतील यशस्वी संघ पुढीलप्रमाणे :

१. १४ वर्षांखालील मुलांचा संघ – प्रथम क्रमांक.

२. १४ वर्षांखालील मुलींचा संघ – प्रथम क्रमांक.

३. १७ वर्षांखालील मुलांचा संघ – प्रथम क्रमांक.

४. १७ वर्षांखालील मुलींचा संघ – प्रथम क्रमांक.

चारही गटांत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवणे ही समर्थ स्कूलसाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमासोबतच प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, क्रीडा शिक्षकांचे नियोजन आणि शाळेने क्रीडा क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन यामुळे हे यश शक्य झाले.

या उल्लेखनीय यशाबद्दल समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा प्रशिक्षक आणि पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरावर चारही संघांनी मिळवलेल्या या विजयामुळे खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *