Sunday , November 22 2026
Breaking News

इस्कॉनमध्ये कार्तिक महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) तर्फे 26 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत कार्तिक मास साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर विविधरंगी कार्तिकांनी सजविण्यात आले आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी दीपदान कार्यक्रम होत असून त्यामध्ये शेकडो भक्त भाग घेत आहेत.

मंगळवारी गोवर्धन पूजा
मंगळवार दि 10 नोव्हेंबर रोजी मंदिर मध्ये गोवर्धन पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त दुपारी 1 वाजता इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन होईल. तर दोन वाजता गोवर्धन आरती होईल.

तीन दिवस कथाकथन
नऊ , अकरा व बारा नोव्हेंबर हे तीन दिवस इस्कॉनमध्ये दामोदर लिला कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. इस्कॉन वृंदावन चे जानकीनाथ दास हे रोज सायंकाळी सात वाजता कथाकथन करतील. त्यानंतर सर्व भक्तांना प्रसादाचे वितरण केले जाईल.
या सर्व कार्यक्रमात भक्तानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *