Monday , November 23 2026
Breaking News

बेळगाव

पाटणे फाट्याजवळ भीषण अपघात; बेळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

  अन्य तिघे किरकोळ जखमी; विनायक कलिंग यांच्या निधनाने परिसरात शोककळा बेळगाव : पाटणे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनायक कलिंग (वय ३६, रा. विनायकनगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणे फाट्याजवळ …

Read More »

जायंट्स ग्रुपच्या वतीने अनुज बेळगावकरचा सत्कार

  बेळगाव : अनुज श्रीकांत बेळगावकर या छोट्या बालकाने 100 मीटर बॅकवर्ड स्केटिंग स्पर्धेत 17 मिनिटे 93 सेकंदात अंतर पूर्ण करून ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नांव नोंद केले तसेच प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत अनिरुद्ध सतीश बेळगावकर याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले त्याबद्दल …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षण दिन साजरा

    बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये दिनांक ११नोव्हेंबर शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या शबाना मुजावर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी नववीतील विद्यार्थिनी हिंदवी विशाल गोवेकर हिने आपले विचार व्यक्त केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या थोर नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य …

Read More »

मुंबईत चित्रकार महेश होनुले यांच्या चित्रांचे प्रदर्शन

    काला घोडा येथील आर्ट एंट्रन्स गॅलरीत १६ नोव्हेंबरपर्यंत कलारसिकांना पर्वणी बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार महेश होनुले यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील काला घोडा येथील ‘द आर्ट एंट्रन्स गॅलरी’ या प्रतिष्ठित कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल अवॉर्डप्राप्त क्रिएटिव्ह फिल्म दिग्दर्शक दीपक एस. व्ही. आणि जगप्रसिद्ध …

Read More »

अंड्यांच्या दरवाढीचा शालेय पोषण आहाराला फटका!

  प्रत्येक अंड्यामागे दोन रुपयांचा अतिरिक्त भार शिक्षकांवर बेळगाव : वाढती महागाई आणि दैनंदिन खर्चाचा ताळमेळ साधताना सर्वसामान्यांची दमछाक होत असतानाच आता शालेय पोषण आहार योजनेलाही महागाईचा फटका बसत आहे. बाजारात अंड्याचा दर प्रतिनग आठ रुपयांवर पोहोचला असताना सरकारकडून मात्र एका अंड्यामागे केवळ सहा रुपये अनुदान दिले जात आहे. त्यामुळे …

Read More »

चांगळेश्वरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश

  बेळगाव : येळ्ळूर विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धेचे उद्घाटन श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चांगळेश्वरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत, येळ्ळूर क्लस्टरचे सीआरपी महेश जळकेकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र मजुकर व अन्य मान्यवरांच्या …

Read More »

उपनगरातील मैदाने बनली मद्यपींचे अड्डे!; रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या ग्लासांमुळे अस्वच्छता

  बेळगाव : शहराच्या उपनगरांमधील मोकळ्या जागा आणि मैदानांचा रात्रीच्या वेळी मद्यपानासाठी वापर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मद्यपान केल्यानंतर रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि अन्य कचरा तेथेच टाकून मद्यपी निघून जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. …

Read More »

रेशनकार्डधारकांना दिलासा; ई-केवायसीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

  अन्न व नागरी पुरवठा विभागाचा निर्णय; मुदतीत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन बेळगाव : राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी दिलासादायक बातमी असून, रेशनकार्डवरील लाभार्थ्यांची अनिवार्य ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता लाभार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी …

Read More »

समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेती आणि विषमुक्त आहाराची गरज : डॉ. शिवाजी कागणीकर

  कुद्रेमानीत जीवन संघर्ष फौंडेशनतर्फे नवरत्नांचा भव्य सत्कार! कुद्रेमानी : दीपावलीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून जीवन संघर्ष फौंडेशन, बेळगाव यांच्या वतीने कुद्रेमानी येथील हनुमान मंदिरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवरत्नांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शिक्षण, साहित्य, वैद्यकीय, उद्योजकीय, क्रीडा आणि देशसेवा क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या गुणवंतांचा …

Read More »

बसस्थानक परिसरात दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

    नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करून शांततेचा भंग; न्यायालयीन कोठडीत रवानगी बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून आरडाओरड व दमदाटी करीत दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. जुबेर अब्दुल वहाब शेख (वय ३६, रा. पाचवा क्रॉस, आझादनगर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. …

Read More »