Sunday , November 22 2026
Breaking News

पाटणे फाट्याजवळ भीषण अपघात; बेळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

अन्य तिघे किरकोळ जखमी; विनायक कलिंग यांच्या निधनाने परिसरात शोककळा

बेळगाव : पाटणे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनायक कलिंग (वय ३६, रा. विनायकनगर, बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणे फाट्याजवळ संबंधित वाहनाचा अपघात होऊन ते रस्त्याच्या बाजूला उलटले. या दुर्घटनेत विनायक कलिंग यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

विनायक यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच विनायकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्योती सेंट्रलचा फुटबॉलपटू ध्यानेश राज्यात अव्वल

Spread the love    बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *