






बेळगाव : अनुज श्रीकांत बेळगावकर या छोट्या बालकाने 100 मीटर बॅकवर्ड स्केटिंग स्पर्धेत 17 मिनिटे 93 सेकंदात अंतर पूर्ण करून ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नांव नोंद केले तसेच प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत अनिरुद्ध सतीश बेळगावकर याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले त्याबद्दल येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने त्या दोघांचा जायंट्स भवनात सत्कार संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स मेनचे अध्यक्ष अँड लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष मधु बेळगावकर, पदाधिकारी विश्वास पवार व संजय पाटील उपस्थित होते.
प्रथम पुंडलिक पावशे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. लक्ष्मण शिंदे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन उभयतांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लक्ष्मण शिंदे यांनी जायंट्सच्या कार्याचा आढावा घेतला. पत्रकार प्रकाश बेळगुंदकर, मधू बेळगावकर, विश्वास पवार, संजय पाटील यांनी खेळाडूंची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खेळाडूंचे आजोबा व बेकिनकेरे ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष मारुती बेळगावकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी
मारुती बेळगावकर, वडील सतीश बेळगावकर, श्रीकांत बेळगावकर, आई संगिता बेळगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक हलगेकर, भास्कर कदम, आकाश लाटुकर, शेखर वाईंगडे यांच्यासह जायंट्स ग्रुपचे
सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूळचे अतिवाड गावचे असल्याने नातेवाईक कृष्णा धामणेकर, भरमा धामणेकर, पांडुरंग पाटील, बाळू तम्मानाचे व इतर शुभेच्छूक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार विजय बनसूर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta