






बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये दिनांक ११नोव्हेंबर शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या शबाना मुजावर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी नववीतील विद्यार्थिनी हिंदवी विशाल गोवेकर हिने आपले विचार व्यक्त केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या थोर नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते एक प्रखर देशभक्त, थोर विद्वान, कुशल पत्रकार, उत्तम वक्ते आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. या शब्दात तिने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta