






बेळगाव : येळ्ळूर विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धेचे उद्घाटन श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चांगळेश्वरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत, येळ्ळूर क्लस्टरचे सीआरपी महेश जळकेकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र मजुकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन शोभा निलजकर यांनी, तर सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन आर. वाय. आळणावर यांनी केले.
दीपा हट्टीकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी येळ्ळूर क्लस्टरमध्ये नव्याने बदली होऊन आलेल्या तसेच क्लस्टरमधून बदली होऊन गेलेल्या शिक्षकांचा क्लस्टरच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षकांच्या वतीने राजहंसगड कन्नड शाळेचे शिक्षक कोलकार, येळ्ळूर वाडी शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील आणि सीआरपी महेश जळकेकर यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात आय. बी. राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धांच्या फाईलचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कांबळे यांनी केले, तर स्नेहल मजुकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदा मुचंडी, सारिका पाटील, संजीवनी धामणेकर, अंकिता पाटील, आरोही पाटील तसेच हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
चांगळेश्वरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
या स्पर्धेत श्री चांगळेश्वरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले.
गट क्रमांक १ ते ४ :
- सौम्या नरेंद्र मजुकर – धार्मिक पठण : प्रथम क्रमांक.
- भूमिका सुधीर लोहार – वेशभूषा : प्रथम क्रमांक.
- रोशन संजय लोहार – चित्रकला : प्रथम क्रमांक.
- सानवी रामचंद्र कमार – कथाकथन : द्वितीय क्रमांक.
- वेदश्री सचिन पाटील – मराठी कंठपाठ व भक्तिगीत : तृतीय क्रमांक.
- रचिता राजू पुजारी – अभिनयगीत : तृतीय क्रमांक.
गट क्रमांक ५ ते ७ :
- आरोही विनायक गडकरी – देशभक्तीगीत व निबंधरचना : द्वितीय क्रमांक.
- सतेज नरेंद्र मजुकर – धार्मिक पठण : तृतीय क्रमांक.
- शरण्या सचिन पाटील – अभिनयगीत : तृतीय क्रमांक.
- प्रांजल यल्लाप्पा बेडरे – मराठी कंठपाठ : तृतीय क्रमांक.
- औजस्वी नागराज रतन – मातकाम : तृतीय क्रमांक.
- निष्कर्ष नंदू कुगजी – चित्रकला : तृतीय क्रमांक.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta