Monday , November 23 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावात ड्रॅगन चाकू घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

      मार्केट पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग पथकाची कारवाई; भरतेश कॉलेज परिसरात चाकू जप्त बेळगाव : शहरात वाढत्या चाकूहल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी गस्त घालणाऱ्या मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने धारदार ड्रॅगन चाकू बाळगून फिरणाऱ्या दोघांना अटक केली आहे. १० नोव्हेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून तपासणी सुरू असताना …

Read More »

चौराशीदेवी सौहार्द सहकारी संस्थेच्या मच्छे शाखेचे नवीन वास्तूत दिमाखात उद्घाटन

  संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल मच्छे : चौराशीदेवी मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सौहार्द सहकारी संस्थेच्या मच्छे शाखेचे स्थलांतर करून नवीन प्रशस्त वास्तूमध्ये शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व दिमाखात करण्यात आले. मच्छे येथील प्रतिष्ठित नागरिक भोंमाजी हावळ यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. डी. ई. नाडगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत या …

Read More »

महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सुभेदार पांडुरंग बिर्जे यांचा हृद्य सत्कार

  उचवडे : (ता. खानापूर) उचवडे येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माजी सैनिक सुभेदार पांडुरंग बिर्जे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. सुभेदार पांडुरंग बिर्जे हे सन १९९६ मध्ये ४ मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते. देशसेवेत तब्बल ३० वर्षे निष्ठेने सेवा बजावून दि. …

Read More »

बेळगावात बुधवारी सहावे राज्यस्तरीय वृत्तपत्र वितरक संमेलन

  राज्यभरातील वृत्तपत्र वितरकांची उपस्थिती; मान्यवरांची लाभणार उपस्थिती बेळगाव : वाचकांपर्यंत दररोज वृत्तपत्र पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या वृत्तपत्र वितरकांच्या हक्कांना, समस्या आणि प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहावे राज्यस्तरीय वृत्तपत्र वितरक संमेलन बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य वृत्तपत्र वितरक महासंघ, न्यूज पेपर डिस्ट्रीब्यूटर चॅरिटेबल ट्रस्ट आणि बेळगाव …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या टेकी ब्रेन्सची AI स्पर्धेत चमक

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे दिनांक 6 नोव्हेंबर 2026 रोजी शालेय प्राचार्य श्री प्रदीप पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली AI इनोव्हेटिव्ह स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील दैनंदिन समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नाविन्यपूर्ण उपाय सादर करून आपल्या टेकी ब्रेन्सची चुणूक दाखवली. या स्पर्धेसाठी …

Read More »

गृहउद्योगाचे आमिष दाखवून ६६२ महिलांना ७.९४ लाखांचा गंडा!

    तीन महिने मोफत रेशन आणि टेलरिंग बॅग निर्मितीचे दाखविले स्वप्न; पैसे घेऊन संशयित महिला पसार बेळगाव : मोफत रेशन आणि घरबसल्या गृहउद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवत खानापूर तालुक्यातील तब्बल ६६२ महिलांची ७ लाख ९४ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरमहा १२०० …

Read More »

पोटच्या मुलाच्या हत्येचा आईनेच रचला कट; प्रियकरासह सहा जणांना अटक

  झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून हत्या, मृतदेह गटारात फेकला बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या मुलाच्या हत्येचा कट आईनेच रचल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या घडवून आणल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी आईसह सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे …

Read More »

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत समिधा बिर्जे व मनस्वी जायण्णाचे यांना सुवर्णपदक

  बालिका आदर्श कुस्ती संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; शहापूर येथे दोघींचा सत्कार बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बालिका आदर्श कुस्ती संकुल केंद्राच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. कु. समिधा भूमेश बिर्जे आणि कु. मनस्वी यल्लाप्पा जायण्णाचे या दोघींनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक …

Read More »

भारत विकास परिषदेचा दीपावली मिलन सोहळा उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या वतीने दीपावली मिलन सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दक्षिण भारत विभागीय अध्यक्ष राजन वालियाथन, मृदुला वालियाथन, कर्नाटक राज्य प्रभारी सुहास चांडक आणि हुबळी येथील उदय रेवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक वंदे मातरम्‌ने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता आणि …

Read More »

इस्कॉनमध्ये कार्तिक महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) तर्फे 26 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत कार्तिक मास साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर विविधरंगी कार्तिकांनी सजविण्यात आले आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी दीपदान कार्यक्रम होत असून त्यामध्ये शेकडो भक्त भाग घेत आहेत. मंगळवारी गोवर्धन पूजा …

Read More »