Sunday , November 22 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलच्या टेकी ब्रेन्सची AI स्पर्धेत चमक

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे दिनांक 6 नोव्हेंबर 2026 रोजी शालेय प्राचार्य श्री प्रदीप पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली AI इनोव्हेटिव्ह स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील दैनंदिन समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नाविन्यपूर्ण उपाय सादर करून आपल्या टेकी ब्रेन्सची चुणूक दाखवली.
या स्पर्धेसाठी ज्योती कॉलेजच्या बी.सी.ए. विभागातील लेक्चरर्स मिस प्रार्थना आणि मिस मयुरी यांनी निर्णायक म्हणून काम पाहिले, तर या स्पर्धेत ग्रीन हाऊसच्या मास्टर रोहित, मास्टर वेदांत आणि मिस रिद्धी यांनी हजेरी, शैक्षणिक प्रगती, संवाद, वाहतूक व विद्यार्थी कल्याण या सर्वांचा समावेश असलेले ‘गुरुकुल अ‍ॅकॅडमिक पोर्टल’ सादर केले. तर रेड हाऊसच्या इयत्ता 10 वीच्या मास्टर श्रवण, मिस पल्लवी आणि मिस देवी यांनी CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन अभ्यास नियोजन, 10 वर्षांचे प्रश्नपत्रिका संच, हिंट-बेस्ड लर्निंग आणि गणित-विज्ञानसाठी शंका निरसनाची सुविधा असलेले ‘नीव JCS’ हे AI पॉवर्ड अ‍ॅप सादर केले. ब्ल्यू हाऊसच्या इयत्ता 9 वीच्या मास्टर हर्ष प्रदीप पाटील, मास्टर मृणांक आणि मास्टर नील यांनी शाळेतील सुरक्षितता, शिस्त, स्वच्छतागृहांचा योग्य वापर व देखभालीसाठी सेन्सर व AI चा वापर या विषयावर तर यलो हाऊसच्या मास्टर पार्थ, मास्टर श्लोक आणि मास्टर दक्ष यांनी ‘प्रागस्थ्य’ हा NCERT आधारित अ‍ॅकॅडमिक सूट प्रोजेक्ट सादर करून परीक्षकांची वाहवा मिळवली.
या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी सादर केलेले विषय अत्यंत सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण होते. याबद्दल शालेय एस्.एम्.सी. चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस्. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *