Sunday , November 22 2026
Breaking News

रेशनकार्डधारकांना दिलासा; ई-केवायसीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Spread the love

 

अन्न व नागरी पुरवठा विभागाचा निर्णय; मुदतीत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

बेळगाव : राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी दिलासादायक बातमी असून, रेशनकार्डवरील लाभार्थ्यांची अनिवार्य ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता लाभार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी निश्चित करण्यात आलेली मुदत संपत आली असतानाही तांत्रिक अडचणी आणि अन्य कारणांमुळे अनेक लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक सदस्यासाठी (लहान मुलांना वगळून) ई-केवायसी करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित सदस्याचे नाव रेशनकार्डमधून वगळले जाण्याची किंवा भविष्यात रेशन मिळविताना अडचणी येण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रास्त भाव धान्य दुकानात जाऊन बायोमेट्रिक अर्थात बोटांचे ठसे देऊन प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा न करता ३० नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *