Sunday , November 8 2026
Breaking News

बेळगावात अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची कारवाई; तीक्ष्ण कोयत्यासह एकाला अटक

Spread the love

 

बेळगाव (वार्ता) : शहरातील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी सक्रिय झालेल्या मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने तीक्ष्ण कोयता बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

६ नोव्हेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीररीत्या घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक विनोद केंकरे (वय ४३) याला ताब्यात घेतले. कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याने आपल्याजवळ धारदार कोयता बाळगल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५९ मधील कलम २७(१) आणि कर्नाटक पोलीस कायदा १९६३ मधील कलम ९७ अन्वये पुढील कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावच्या बाजारपेठा गजबजल्या

Spread the love  विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; वस्त्रदालने, फटाके, फराळाचे स्टॉल आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *