



मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे इयत्ता दहावीच्या पालकांशी संवाद आणि दिवाळी सणानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाश कंदील प्रदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील हे होते.
सुरुवातीला शाळा सुधारणा समितीचे सदस्य शामराव पाटील व सदस्य शिरीष पाटील यांच्या हस्ते कुंडीतल्या रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी विविध स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा माजी मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, माजी मुख्याध्यापक एम. वाय. केदार, पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. जाधव, सदस्य सुधीर पाटील आदींच्या हस्ते पुस्तके, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी मुख्याध्यापक पी. वाय. पाटील यांनी पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अभ्यास, शिस्त व उज्ज्वल भविष्य याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष आर. वाय. पाटील म्हणाले, “आठवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेऊन पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवून आपल्या कलेचे कौशल्य दाखविले, याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.” तसेच विद्यार्थ्यांच्या निकोप वाढीसाठी पालकांशी संवाद साधून त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम कुराडे यांनी केले, तर सौ. के. एल. पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. लगाडे, बी. व्ही. गुडगेनहट्टी, ए. एस. पाटील, एस. आर. पाटील यांच्यासह बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta