Thursday , June 4 2026
Breaking News

पोतदार ज्वेलर्सने घडवला इतिहास; अवघ्या १२ तासांत बनवले ११ तोळ्यांचे सोन्याचे गंठण!

Spread the love

 

बेळगाव : कोणतीही तडजोड न करता शुद्ध सोन्याचा वापर करत सुबक आणि सुंदर नक्षीकाम आणि वेळेचे अचूक नियोजन म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले बेळगावातील एकमेव सराफी व्यापारी म्हणजेच पोतदार ज्वेलर्स. कमी वेळेत आणि विश्वासू सोन्या चांदीचे व्यापारी म्हणून बेळगावकरांची पहिली पसंती ही पोतदार ज्वेलर्सकडेच का असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच पोतदार ज्वेलर्सने अवघ्या बारा तासात 11 तोळ्याचे पारंपारिक सोन्याचे भव्य गंठण तयार करून देत अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखविले आहे.

कमी वेळ ग्राहकांची अपेक्षा आणि परंपरेची मोठी जबाबदारी ही तीनही आव्हाने एकत्र पेलत बेळगाव येथील पोतदार ज्वेलर्सने आपल्या विश्वासार्हतेचा ठसा ग्राहकांच्या मनात पुन्हा एकदा उमटवला आहे. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना त्यांच्या कुलदेवीस अर्पण करण्यासाठी सोन्याचे मंगळसूत्र तयार करून हवे होते मात्र यासाठी वेळेची अत्यंत कमी मर्यादा त्याचबरोबर मंगळसूत्रांवरील नाजूक आणि सुबक नक्षीकाम, सोन्याची शुद्धता तसेच धार्मिक श्रद्धेचा मान या सर्व कारणांमुळे सराफी बाजारातील अनेक नामांकित सराफ आणि हे काम स्वीकारण्यास नकार दिला होता, परंतु 137 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या खडेबाजार येथील पोतदार ज्वेलर्सने हे आव्हान स्वीकारत आपल्या कुशल कारागिरीच्या आणि उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर हा दागिना केवळ बारा तासात पूर्ण करून नवा विक्रम नोंदविला आहे. या दागिन्यात श्रद्धा, परंपरा आणि कुशल कारागीर या दागिन्यात पहायला मिळत आहे. पोतदार ज्वेलर्सच्या अचूक नियोजन आणि गुणवत्तेची साक्ष या दागिन्यातून घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *