Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगाव

भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासावर बंधने : गिरीश पतके

  गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधनीच्या वतीने बक्षीस वितरण सोहळाचे आयोजन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी यांच्यावतीने निबंध व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी सन्माननीय गिरीश पतके …

Read More »

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत : विश्व हिंदू परिषदची मागणी

  बेळगाव : भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे उत्तर प्रदेश, कोषाध्यक्ष कृष्णा भट यांनी केली. आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात ते बोलत होते. बांगलादेशात हिंदूंवर दिवसेंदिवस अत्याचार होत असून अनेक लोक मारले जात आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या …

Read More »

हिंडलगा कारागृहावर पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली छापा

  बेळगाव : अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पहाटे पोलिसांनी अचानक धडक दिली. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांच्या नेतृत्वाखाली हा छापा घालण्यात आला. या छाप्यात कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह २६० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. छाप्यादरम्यान पोलिसांनी तंबाखूचे …

Read More »

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागची उद्या बैठक

  बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन, नवी गल्ली, शहापूर या ठिकाणी बोलाविण्यात आली आहे. तरी शहापूर विभागील शहापूर, होसूर, खासबाग, भारत नगर, वडगांव, जुने बेळगांव, आदी …

Read More »

श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

  बेळगाव : गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकमान्य टिळक गणेश महामंडळाच्या मागणीनुसार मिरवणूक मार्गावरील विविध चौकात लोंबकळत असलेल्या विद्युत तारांची शुक्रवारी सकाळी शहर अभियंता संजीव हमन्वर यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, गिरीष धोंगडी, सुनिल जाधव उपस्थित …

Read More »

‘बेळगाव रन’ मॅरेथॉनच्या पोस्टरचे अनावरण

  बेळगाव : आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनचे सुनील आपटेकर यांनी मॅरेथॉन स्पर्धेबाबत सविस्तर माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांना दिली. पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात प्रमुख पाहुणे पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांच्या हस्ते आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी …

Read More »

धर्मवीर चौकातील आंदोलन प्रकरणी राज्यद्रोह खटल्यातून ४० जणांना वगळले

  बेळगाव : धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केल्याप्रकरणी राज्यद्रोह व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल असलेल्या ५५ पैकी ४० जणांना या खटल्यातून वगळण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. खटल्याची पार्श्वभूमी अशी, बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील शिवप्रेमींनी २०१९ मध्ये धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन …

Read More »

माळमारुती पोलिसांच्या कारवाईत आंतरराज्य चोरटा जेरबंद

  बेळगाव : बेळगावमध्ये घडत असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माळमारुती पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका आंतरराज्य चोराला अटक करण्यात आली आहे. नागराज सुभाष कचेरी कमलापूर (रा. गुलबर्गा) उर्फ नवीन गरकुल कुंभारी (रा. सोलापूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत. त्याने त्याच्या मित्रांसह …

Read More »

स्नेहम कारखान्याने जाहीर केले मृत कामगाराच्या कुटुंबीयांना 18 लाख रुपयांची भरपाई

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. कारखान्याला नुकत्याच लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना कारखाना १८ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या यल्लाप्पा गौंड्यागोळ याच्या वडिलांच्या आणि आईच्या नावे कारखान्याने प्रत्येकी नऊ लाख रुपयांचा धनादेश जारी केला …

Read More »

पॅरिस ऑलिम्पिक – २०२४; हॉकीमध्ये कांस्य पदक जिंकल्याने बेळगावमध्ये विजयोत्सव

  बेळगाव : पॅरिस ऑलिम्पिक – २४ मध्ये कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाचा विजयोत्सव बेळगावमध्ये साजरा करण्यात आला. शुक्रवारी हॉकी बेळगावच्या सदस्यांसह खेळाडूंनी एकत्रित येऊन धर्मवीर संभाजी चौक येथे बेळगावचे ऑलिम्पिक हॉकीपटू बंडू पाटील यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बेळगाववासीयांना १०० किलो मिठाई वाटप करण्यात आली आणि विजयाचा …

Read More »