Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

कवी परशराम खेमणे उद्या गुंफणार कवी समजून घेतानाचे सहावे पुष्प

  बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने “कवी समजून घेताना – पुष्प सहावे” या उपक्रमांतर्गत कवी परशराम खेमणे यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “जगण्याचे पान” या शीर्षकाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात कवी परशराम खेमणे आपल्या कवितांमधील अनुभव, भावना आणि सर्जनशील प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहेत. ते …

Read More »

सामाजिक बांधिलकीचे महत्व प्रत्येकाने जाणून घ्यावे : रामदासी महाराज

  बेळगांव : सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्य क्षेत्रात बेळगाव शहराचे आपले खास वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगाव शहरात आजही अनेक सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थपणे आपले कार्य करत आहेत.सामाजिक बांधिलकीचे महत्व जाणून प्रत्येकाने राष्ट्राचा कणा मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री. रामदास महाराज यांनी बोलताना केले. मुक्तिधाम सेवासुधारणा मंडळाच्या वतीने …

Read More »

बेळगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा

  बेळगाव : बेळगावमध्ये आज वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपारी बेळगाव शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार वळिवाचा पाऊस झाला. दुपारच्या सुमारास अचानक आकाश …

Read More »

बेळगावमध्ये महानगरपालिकेकडून मारुती गल्लीत अतिक्रमण हटाव मोहीम

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने मारुती गल्ली कॉर्नरवरील अनधिकृत बांधकामावर आज अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. लोकायुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे या भागातील व्यापारी आणि इमारत मालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने लोकायुक्त न्यायालयाच्या आदेशानुसार आज मारुती गल्ली कॉर्नर येथील इमारत अनधिकृत असल्याचे सांगत …

Read More »

दहावीच्या गुणपत्रिकेवर मराठीचा उल्लेख टाळला; चूक लक्षात येताच यूटर्न

  बेळगाव : कर्नाटकात आज दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे परंतु ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालात मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षण खात्याचा हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रिकेवर प्रथम भाषा मराठी असा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेचा गौरव

  बेळगाव : ‘मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी’ या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतील २११ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील १६००० स्पर्धकांसोबत यश संपादन केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा गौरव दिनांक 18 एप्रिल रोजी करण्यात आला. देशभक्तीचा संस्कार शालेय जीवनात होणे गरजेचे आहे. आदर्श नागरिक …

Read More »

राजहंसगडावर रंगणार थरारक गड चढणे–उतरणे स्पर्धा; ‘गडाचा राजा’ व ‘गडाची राणी’ किताबासाठी स्पर्धकांमध्ये चुरस

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंसगड (येळ्ळूरगड) येथे भव्य गड चढणे–उतरणे स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, यंदाही स्पर्धकांमध्ये मोठी उत्सुकता आणि चुरस निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता …

Read More »

दहावीच्या परीक्षेत अथणीची प्रार्थना बिरादार राज्यात प्रथम

  बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अथणी तालुक्यातील कटगेरी येथील सरकारी शाळेची विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. यंदाच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील अथणीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या प्रार्थनाने …

Read More »

उद्या दुपारी जाहीर होणार एसएसएलसीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेची कमाल!

  बेळगाव : आताच आमच्या लोकप्रिय सोशल मेडियाला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. २२ एप्रिल २०२६ कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने इयत्ता दहावी (SSLC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता निकाल घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल …

Read More »

शिवजयंती मिरवणुकीत शिवभक्तांसाठी पाण्याचे वाटप; गोगटे मिलकडून स्तुत्य उपक्रम

  बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणुकीच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असताना, हजारो शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना दिलासा मिळावा यासाठी गोगटे मिलचे प्रमुख श्री. गोगटे सर यांनी मोठ्या उदार मनाने हजारो पाण्याच्या बाटल्यांचे प्रायोजन करून त्याचे वितरण केले. या …

Read More »