बेळगाव : रोटरी क्लबच्या वतीने कणबर्गी येथील शासकीय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (MHM) विषयावरील जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ११० विद्यार्थिनींनी लाभ घेतला. सत्रामध्ये मासिक पाळीदरम्यान आवश्यक स्वच्छता, संतुलित आहार, वैयक्तिक आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींमधील गैरसमज दूर करून …
Read More »शाळा क्र. १९च्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता चंदगडकर-निकम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञतेचा अविस्मरणीय सोहळा
बेळगाव : काळाच्या ओघात अनेक चेहरे येतात आणि निघून जातात. मात्र काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याचा असा अमिट ठसा उमटवून जातात की, त्यांची ओळख केवळ एका पदापुरती मर्यादित राहत नाही, तर ती अनेक पिढ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत, संस्कारांची बीजे रुजवत आणि शिक्षणाला माणुसकीची …
Read More »‘एसआयआर’ फॉर्म कन्नडसोबत मराठीतही उपलब्ध करून द्या; सकल मराठा समाज नेते किरण जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : भारत सरकार आणि निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या देशभरात राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक मतदारांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी, सोमवार दिनांक ६ जुलै रोजी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान …
Read More »निपाणी जवळील तवंदी घाटातील अपघातात दोन जण जागीच ठार
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटाच्या उतारावर वेगाने येणाऱ्या ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कोल्हापूर येथील दोन मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (वैद्यकीय प्रतिनिधी) जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता.६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची भीषणता …
Read More »खानापूरात पावसाचा कहर; बेळगाव जिल्हा अक्षरशः जलमय!
सहा दिवसांत विक्रमी २६४.२ मिमी पाऊस; नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले बेळगाव : बेळगाव जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः धडक दिली असून गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः खानापूर तालुक्यावर पावसाचा सर्वाधिक मारा झाला असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने …
Read More »चलवेनहट्टी – अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचे वृक्ष कोसळले
बेळगाव : चलवेनहट्टी – अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचा मोठा वृक्ष कोसळल्याने बेळगाव शहर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पण या घटनेची माहिती मिळताच अगसगे ग्रामपंचायत उपाध्यक्ष आणी कार्यशील सदस्य गुंडू कुरेण्णवर हे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी उमेश कांबळे आणी लक्ष्मण कंग्राळकर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. उमेश कांबळे आणी लक्ष्मण …
Read More »मुसळधार पावसामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळा, अंगणवाड्या आणि पीयूसी महाविद्यालयांना उद्या सुट्टी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेळगाव व खानापूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंतच्या) महाविद्यालयांना उद्या दि. मंगळवार 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला …
Read More »दूधसागरचा मोह ठरला महाग; रेल्वे रुळांवरून बेकायदेशीर ट्रेक करणाऱ्या ३२ पर्यटकांवर आरपीएफची धडक कारवाई; ₹१६ हजारांचा दंड
बेळगाव/कॅसल रॉक : पावसाळ्यात फेसाळणाऱ्या दूधसागर धबधब्याचे मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. मात्र, हा मोह आता पर्यटकांच्या खिशालाच नव्हे तर जीवावरही बेतू लागला आहे. वारंवार इशारे, बंदी आदेश आणि कठोर निर्बंध झुगारून रेल्वे रुळांवरून बेकायदेशीर ट्रेक करणाऱ्या ३२ पर्यटकांवर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) रविवारी धडक कारवाई करत …
Read More »देवेंद्र जिनगौडा, हनिवेल, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश
बेळगाव : खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विविध गटात आणि हनिवेल स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून लैला शुगरचे संचालक …
Read More »संकटात वेळ दवडू नका; थेट ‘112’ वर कॉल करा!
पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका सेवा एका कॉलवर; बेळगाव शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन बेळगाव : कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीची मदत मिळावी आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून जलद प्रतिसाद देता यावा, यासाठी २४ तास कार्यरत असलेली राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाइन सेवा ‘डायल 112’ नागरिकांसाठी उपलब्ध आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta