Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

संकटात वेळ दवडू नका; थेट ‘112’ वर कॉल करा!

    पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका सेवा एका कॉलवर; बेळगाव शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन बेळगाव : कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीची मदत मिळावी आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून जलद प्रतिसाद देता यावा, यासाठी २४ तास कार्यरत असलेली राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाइन सेवा ‘डायल 112’ नागरिकांसाठी उपलब्ध आहे. …

Read More »

जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांनी आपल्या कार्यालयात भारताचे प्रख्यात राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्राच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी आपले संपूर्ण …

Read More »

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज बेळगावात; शहर अभेद्य सुरक्षा कवचात

  अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीसाठी आठवडाभर मुक्काम; तीन ठिकाणे ‘रेड झोन’, ड्रोन उड्डाणास बंदी बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सोमवारी (६ जुलै) बेळगावात दाखल होत असून, त्यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण शहरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. पुढील आठवडाभर बेळगावात त्यांचे वास्तव्य राहणार असून, संघाच्या अत्यंत …

Read More »

आनंदनगर अंधारात; तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव, नागरिक संतप्त!

  वारंवार खंडित होणारा व कमी दाबाचा वीजपुरवठा; घरगुती उपकरणे धोक्यात, हेस्कॉमच्या कारभारावर प्रश्नचिन्ह बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. थोड्याच वेळासाठी वीज आली तरी ती अत्यंत …

Read More »

भाग्यनगर येथे कारवर झाड कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला

  बेळगाव : बेळगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जनजीवनाला बसत असून, सोमवारी भाग्यनगर येथील तिसऱ्या क्रॉसमध्ये एक मोठे झाड कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. सततच्या पावसामुळे झाडाची मुळे कमकुवत झाल्याने रस्त्यालगतचे हे मोठे झाड अचानक कारवर …

Read More »

मतदार यादी अपडेटसाठी बीएलओची वाट पाहू नका!; घरबसल्या ऑनलाईन भरा “एसआयआर” फॉर्म, २९ जुलै अंतिम मुदत

  बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) 2026’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार पडताळणी व नोंदणीसाठी २९ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी मराठी भाषिक मतदारांना कन्नड भाषेतील फॉर्म दिले जात …

Read More »

कावळेवाडीतील वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कावळेवाडी प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. इ  पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. ‌ अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे …

Read More »

‘एसआयआर’च्या नावाखाली मराठी मतदारांवर घाला?

  एकाही मराठी भाषिकाचे नाव वगळू देणार नाही; बूथ निहाय यंत्रणा तातडीने उभी करण्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे आदेश बेळगाव : विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मराठी भाषिक मतदारांची नावे वगळण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक मराठी भाषिक मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी समितीच्या …

Read More »

कृष्णा–पंचगंगा नदीला पूर; दत्त मंदिर परिसरात सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरासह बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, दोन्ही नद्यांच्या संगमावर असलेले प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले असून, परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत तब्बल …

Read More »

व्याजाच्या रकमेसाठी जीवे मारण्याची धमकी, दोघे जेरबंद

  बेळगाव : बेकायदेशीररीत्या व्याजाचा धंदा करून कर्जदाराकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा आरोपींना रायबाग पोलिसांनी रविवारी अटक केली. रोहिदास गल्ली येथील विठ्ठल तुकाराम माने यांनी आरोपींकडून ३.१० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आतापर्यंत तब्बल १८.६० लाख रुपये व्याजापोटी भरूनही आरोपी आणखी पैशांची मागणी …

Read More »