Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांची दुचाकी नादुरुस्त झाली तर विनामूल्य सेवा!

  बेळगाव : शिवजयंती उत्सव मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून अनेक शिवभक्त येतात. त्यावेळी त्यांच्या दुचाकी नादुरुस्त होऊन त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे. त्यांची ही अडचण मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या लक्षात येताच मंडळाचे उपाध्यक्ष श्री. गणेश दड्डीकर यांनी बेळगाव स्कूटर आणि मोटार मेकॅनिक ओनर असोसिएशन बेळगाव यांच्या …

Read More »

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील आपल्या तलाव पुनरुज्जीवनाच्या तिसऱ्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या प्रकल्पामुळे या गावात शाश्वत जलसंवर्धनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्यास फाउंडेशनतर्फे सुळगा येथील 3.5 एकर क्षेत्रात विस्तारलेला तलाव पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेण्यात आले …

Read More »

रणझुंझार चौक, निलजी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : रणझुंझार चौक, निलजी येथे रणझुंझार परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लक्ष्मण सिद्राय गोमानाचे व निर्मला गोमानाचे या दांपत्याच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व आदर्शांचा गौरव करत त्यांच्या …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आजपासून बेळगाव होणार शिवमय; शिवज्योतीच्या आगमनाने उत्साह शिगेला बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पासून संपूर्ण शहर शिवमय होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवर आणि “जय जिजाऊ, जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. छत्रपती शिवाजी उद्यान येथे …

Read More »

सकल मराठा समाज बेळगावतर्फे श्री शिवजयंती भक्तीभावात

  बेळगाव : बेळगावातील सकल मराठा समाजातर्फे आज रविवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. श्री शिवजयंती निमित्त सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय …

Read More »

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या पालखी पूजनाने श्रीफळ वाढवून सुरु करण्यात येणार आहे. यावेळी आजी -माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित …

Read More »

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी विशेष रुद्राभिषेक करण्यात आला असून कपिलनाथाच्या पिंडीवर हापूस आंब्यांची आकर्षक आरास साकारण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अनोखी आंबा आरास फ्रूट मार्केटमधील प्रसिद्ध आंबा व्यापारी तुषार …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवजयंती साजरी

  बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक पारंपरिक शिवजयंतीचे हे १०७ वे वर्ष असून आज पारंपारिक शिवजयंती उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. सकाळी सात वाजल्यापासून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे विविध गडकिल्ल्यावरून येणाऱ्या शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिवज्योतींचे स्वागत अध्यक्ष अंकुश केसरकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तथा …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले, नरगुंदकर भावे चौक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर, शिवसेना रिक्षा स्थानक, एस पी एम रोड, कोरे गल्ली शहापूर आदी विविध ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यात आले. शतकाहून अधिक …

Read More »

पारंपारिक पद्धतीने साजरी होणारी बेळगावची शिवजयंती

  इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर…. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती” छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची प्रतीक्षा सालाबादप्रमाणे यंदाही बेळगाववासियांना लागली आहे. यंदाचा पारंपारिक शिवजयंती उत्सव 19 एप्रिल रोजी होणार असून दैदिप्यमान आणि भव्यदिव्य मिरवणूक सोहळ्याने हा उत्सव अधिकच दिमाखात पार पडणार आहे. शिवजयंती सोहळ्याने …

Read More »