Friday , November 6 2026
Breaking News

दड्डीत शिक्षक दाम्पत्याच्या घरात चोरी; १८ तोळे चांदीसह २० हजारांची रोकड लंपास

Spread the love

 

दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथे सुट्टीसाठी मूळ गावी गेलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घरातून १८ तोळे चांदी, ज्याची किंमत सुमारे ३ लाख ६० हजार रुपये आहे, तसेच २० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

महंतेश पुजेरी आणि लक्ष्मी पुजेरी हे शिक्षक दाम्पत्य दड्डी येथे राजू नार्वेकर यांच्या घरात भाड्याने राहत होते. ऑक्टोबर महिन्यातील २० दिवसांच्या सुट्टीनिमित्त ते कित्तूर तालुक्यातील शिवनूर या आपल्या मूळ गावी गेले होते. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी दड्डी येथील घरी परतल्यावर घराचे कुलूप तोडल्याचे आणि चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक दाम्पत्याच्या घरात झालेल्या या चोरीमुळे दड्डी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *