


बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या, मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
येळ्ळूर येथील श्री बालशिवाजी वाचनालयातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. आगामी काळ्या दिनाच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात येणार असून, त्यादृष्टीने आवश्यक नियोजनावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला येळ्ळूर विभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष विलास ना. घाडी यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta