Friday , November 6 2026
Breaking News

विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचा स्नेहमेळावा उत्साहात

Spread the love

 

बेळगांव : येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिद्ध विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीच्या वतीने रविवारी आयोजित केलेला स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी चेअरमन कुमार पाटील होते.

बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त या मेळाव्यात सत्कार करण्यात आला.

प्रारंभी व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. तसेच त्यांनी कृष्णा शहापूरकर यांच्या कार्याची माहिती दिली. यानंतर चेअरमन कुमार पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा, ज्येष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी व कर्मचारी विलास पेडणेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, फळे व पुष्पगुच्छ देऊन शहापूरकर यांचा सत्कार करण्यात आला.
यानिमित्त संस्थेचे उपस्थित हितचिंतक व मित्रपरिवार यांनी कृष्णा शहापूरकर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कृष्णा शहापूरकर म्हणाले की, पत्रकारिता करताना सामाजिक कार्य केले पाहिजे याची जाणीव झाल्याने राजकीय, सामाजिक, सहकार,।सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील विविध संस्थांशी जोडला गेलो. या संस्थांमध्ये मी जे काही थोडेफार काम केले ते माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच. हा सत्कार या सर्वांचा आहे. यापुढेही माझ्या परीने मी सामाजिक कार्य करीत राहीन.

बाजार गल्ली, वडगांव येथील वसंत-सुधा निवास स्थानातील सभागृहात झालेल्या या स्नेह मेळाव्यास संचालक प्रशांत पाटील, संकेत कुलकर्णी, किरण धामणेकर, संचालिका निता कुलकर्णी, सौ. पूजा पाटील, सल्लागार संचालिका सौ. धनुजा पाटील, कर्मचारी सविता चव्हाण, नितीन कपिलेश्वरकर, सदानंद सामंत, प्रा. श्रीकृष्ण आजगावकर, मधुकर सामंत, सौ. सुमन दत्ता नाडगौडा, पद्मा नाडगौडा, वैष्णवी नाडगौडा यांच्यासह सोसायटीचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *