बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक उद्या बुधवार दि.29/10/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. विभाग म. ए. समितीच्या कार्यालयात बालशिवाजी वाचनालय येथे होणार आहे. 1 नोव्हेंबर काळा दिन यासाठी बैठक होणार आहे. तरी या बैठकीला आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायत, तसेच नेते व …
Read More »कोणत्याही परिस्थितीत “काळ्या दिनी” फेरी काढण्याचा शहर समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी एक नोव्हेंबर “काळ्या दिनी” फेरी काढण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे होते. …
Read More »जय किसान भाजी मार्केटच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या
बेळगाव : जय किसान भाजी मार्केटला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जोरदार दणका दिला असून जय किसान भाजी मार्केटच्या दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. बेळगाव सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी भाजी मार्केट) आणि जय किसान खाजगी भाजीपाला मार्केट यांच्यात मागील काही महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. …
Read More »शामराव नाना पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान
बेळगाव : मुळचे येळ्ळूर येथील आणि भाग्यनगर ९ वा क्रॉस येथील रहिवासी शामराव नाना पाटील यांचे पहाटे ३:१५ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. निधनानंतर लागलीच त्यांच्या कुटुंबीयांनी जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाविषयी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार केएलई नेत्रपेढीच्या डॉ बाळेश मऱ्याप्पगोळ …
Read More »मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये इन्फंट्री डे साजरा
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे इन्फंट्री डे चे आयोजन करण्यात आले होते. मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना शरकत वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे इन्फंट्री डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला लष्कराचे अधिकारी, जवान आणि सेवानिवृत्त …
Read More »अंमली पदार्थाचे सेवन प्रकरणी ८ जण अटकेत
बेळगाव : बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरात पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी असहाय्य वर्तन करणाऱ्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (बी) अंतर्गत …
Read More »भगव्या पताकाची महापालिकेला कावीळ!
बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त 1 नोव्हेंबर रोजी शहरात मिरवणूक काढली जाते. या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेकडून शहरातील विविध गल्ल्यांमध्ये लावण्यात आलेल्या भगव्या पताका काढल्या जात आहेत. दिवाळीनिमित्त खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, काकतीवेस आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत भगव्या पताका लावल्या होत्या. मात्र, राज्योत्सव मिरवणुकीचे कारण पुढे करत मिरवणूक …
Read More »कवि संमेलन के सर्जनशीलता जिवंत ठेवण्याचे सुंदर माध्यम : प्रा. विवेक दिवटे
बेळगाव : येथील लिंगराज कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय आणि लिंगराज पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभाग आणि प्रेमचंद क्लबच्या संयुक्त विद्यमानाने वतीने कवि संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव येथील सुप्रसिद्ध कवी आणि यरगट्टी येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय हिंदी विभागाचे प्राध्यापक श्री. विवेक दिवटे लाभले. …
Read More »म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले …
Read More »“शौर्यवीर रन २०२५” स्पर्धेत बेळगावात धावले शेकडो धावपटू!
बेळगाव : मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रविवारी “शौर्यवीर रन २०२५”चे आयोजन करण्यात आले होते. ७९ व्या इन्फंट्री डे निमित्त शौर्यवीर रनचा प्रारंभ शिवाजी स्टेडियम येथून झाला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून रनचा प्रारंभ केला. तीन विभागात घेतल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta