Monday , April 20 2026
Breaking News

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : भारतीय सी.आर.पी.एफ. व सी.आय.एस.एफ. पोलीस सेवेत निवड झालेल्या मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथील माजी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शाळेत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या एस.डी.एम.सी. अध्यक्षा दिव्या संदिप कुंडेकर होत्या.
या वेळी सत्कारमूर्ती म्हणून कु. अक्षता अनिल पाटील, कु. तन्वी भाऊराव पाटील व कु. साहिल शंकर पाटील यांच्यासह त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी केले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सध्याच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिस्त, परिश्रम व देशसेवेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी भारतीय पोलीस सेवेत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात दिव्या संदिप कुंडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका एम. एस. मंडोळकर व सहशिक्षक सातेरी पाखरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सहशिक्षिका सौ. मेघा देसाई यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेचे सदस्य मूर्तीकुमार माने, मारुती यळगुकर, शशिकांत पाटील, दिनेश लोहार, विजय धामणेकर, चांगदेव मुरकुटे, सदस्या अलका कुंडेकर, शुभांगी मुतगेकर, माधुरी कुगजी, रेश्मा काकतकर, अर्चना देसाई, ज्योती पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *