दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा; टँकरद्वारे तहान भागविण्याचा प्रयत्न बेळगाव : पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने बेळगाव शहरावर आतापासूनच जलसंकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून, दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत …
Read More »चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीला अटक
बेळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरातील हनुमाननगर येथे घडली आहे. अश्विनी हेगडे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती विठ्ठल हेगडे याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लिगवाड येथील …
Read More »प्रभुनगर पुलाजवळ दुचाकी घसरून अपघात; ३७ वर्षीय स्वाराचा मृत्यू
खानापूर : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील प्रभुनगर पुलाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नारायण परशुराम कुंडेकर (वय ३७, रा. महादेव गल्ली, राजहंसगड, ता. जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (ता. २० ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण कुंडेकर हे होंडा …
Read More »‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..’ : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ग्रंथालयाचा शुभारंभ
बेळगाव : युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने आणि ‘राज्य मराठी विकास संस्था, मुंबई’ यांच्या सहकार्याने युवा समितीच्या टिळकवाडी येथील कार्यालयात ग्रंथालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व विविध ज्ञानग्रंथांचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित बालचमू तसेच …
Read More »समितीच्या नगरसेवकांची निष्ठा कुणाशी? मराठी जनतेत संभ्रम
बेळगाव : बेळगावच्या सीमाप्रश्नाबाबत महाजन अहवाल अंतिम असून बेळगाववर कर्नाटकाचा हक्क असल्याचा ठराव अलीकडेच बेळगाव महानगरपालिकेत संमत झाला. या ठरावाला मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून आलेल्या राष्ट्रीय पक्षांतील काही नगरसेवकांनी पाठिंबा दिला, तर काहींनी मौन बाळगून अप्रत्यक्ष सहमती दर्शविल्याची भावना सीमाभागातील मराठी जनतेत निर्माण झाली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या …
Read More »दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक आणि आदिवासी संघटना महासंघ राज्याध्यक्ष पदी भीमराव पवार
बेळगाव : दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक आणि आदिवासी संघटनेच्या महासंघाच्या कर्नाटक राज्याध्यक्षपदी श्री. भीमराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे दिनांक 18 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. उदित राज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. भीमराव पवार हे अखिल कर्नाटक चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीबद्दल …
Read More »महिला सक्षमीकरणासाठी सकल मराठा समाजाचा पुढाकार; मनिषा पाटील यांच्या भाकरी केंद्राचे उद्घाटन
भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन बेळगाव : महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या प्रगतीत योगदान द्यावे, या उद्देशाने सकल मराठा समाजाच्या वतीने रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. याच उपक्रमांतर्गत मनिषा पाटील यांनी सुरू केलेल्या भाकरी केंद्राचे उद्घाटन …
Read More »ज्योती कॉलेज मैदानावर ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्यानंतर ‘जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन’तर्फे स्वच्छता मोहीम संपन्न
बेळगाव: नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या २० सदस्यांनी ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्यानंतर ज्योती कॉलेजच्या मैदानाची स्वच्छता केली आणि तेथील कचरा गोळा केला. सदस्यांनी संपूर्ण परिसरामध्ये पसरलेला कचरा गोळा करून महानगरपालिकेच्या वतीने योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एकत्र ढीग करून ठेवला. या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी …
Read More »कडोली साहित्य संमेलन १० जानेवारीला
कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे आयोजित ४२ वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १० जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी (ता. २०) रात्री साहित्य संघाच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मोहन पाटील होते. या बैठकीत ४२ वे कडोली मराठी साहित्य …
Read More »कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याच्या तुटलेल्या हाताची तात्पुरती दुरुस्ती
उत्सवापूर्वी प्रशासनाची धावपळ; कायमस्वरूपी दुरुस्ती आणि नवीन पुतळ्याची मागणी बेळगाव : कित्तूर उत्सवाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याचा तलवार धारण केलेला उजवा हात तुटून पडल्याची घटना समोर आली होती. या घटनेची दखल घेत तालुका प्रशासन आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत रात्रीतूनच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta