बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील वण्णूर गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी मागण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला नेसरगी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी हनुमंतप्पा यमनप्पा इतापी हा …
Read More »जिल्ह्यात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९५.६ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण
बेळगाव : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी जिल्हाभर विशेष लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात ९५.६ टक्के बालकांचे पोलिओ लसीकरण पूर्ण झाले आहे. पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्वास कारणीभूत ठरणारा गंभीर आजार असून त्यापासून …
Read More »रिमझिम पावसात भक्तिभावाचा दरवळ; वटपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात सुवासिनींची गर्दी
बेळगाव : पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे हिंदू संस्कृतीतील पवित्र वटपौर्णिमा व्रत सोमवारी जिल्हाभर मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरे करण्यात आले. रिमझिम पावसाची सतत हजेरी असूनही पारंपरिक वेशभूषा, नटलेला साज-शृंगार आणि हातात पूजेचे साहित्य घेऊन सुवासिनींनी मंदिर परिसर गाठत वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. …
Read More »कंग्राळ गल्ली बेळगाव येथे पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ
बेळगाव : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने २८ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला कंग्राळ येथील बूथ क्रमांक १९ (सावित्री बिल्डिंग) येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मोहिमेला सकारात्मक सुरुवात मिळाली. मोहिमेच्या प्रारंभी उपस्थित पहिल्या पाच …
Read More »देसूर येथे काँग्रेस कमिटीची बैठक; मतदार यादी अद्ययावत करण्यावर मार्गदर्शन
देसूर : मा. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली देसूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार यादी अद्ययावत करण्यासंदर्भात बीएलओ (BLO) बाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी बूथ पातळीवर …
Read More »रामदेव हॉटेलजवळ धावत्या कारला अचानक आग; काही क्षणांतच कार जळून खाक
बेळगाव : शहरातील रामदेव हॉटेल समोरील डी-मार्ट कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी धावत्या स्विफ्ट कारला अचानक आग लागून काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कार चालू असतानाच इंजिन भागातून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण केले. परिस्थिती लक्षात येताच चालक व …
Read More »बेळगाव येथील वक्तृत्व स्पर्धेत मच्छेच्या माजी विद्यार्थ्याची चमक; पुष्कर कोलेकर याला द्वितीय क्रमांक
बेळगाव : छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मच्छे येथील माजी विद्यार्थी कु. पुष्कर परशराम कोलेकर याने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुष्कर हा सरकारी मॉडेल प्राथमिक …
Read More »वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली; पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी
बेळगाव : सोमवारी (दि. २९) साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी लगबग पाहायला मिळाली. रविवारची सुटी असल्याने सकाळपासूनच पूजासाहित्य, फुले, फळे आणि वाण खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून उपवास करण्याची परंपरा असल्याने …
Read More »कॅम्प पोलीस ठाण्याचे नव्या इमारतीत स्थलांतर; उद्यापासून बीएसएनएल इमारतीतून सेवा
बेळगाव : शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याचे सोमवार, दि. २९ जून २०२६ पासून नव्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. हाय स्ट्रीटवरील बी.सी. क्र. ९७ येथील जुन्या इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता धोक्यात आल्याने हे पोलीस ठाणे आता ग्लोब चित्रपटगृहासमोरील बीएसएनएल इमारतीत कार्यरत राहणार आहे. पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी यापुढे कॅम्प …
Read More »विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे : अजय कांडर
बेळगाव : “जेव्हा कविता मरते, तेव्हा भाषा मरते आणि भाषा संपली की संस्कृतीही नष्ट होते. भाषा जिवंत ठेवण्याचे सामर्थ्य कवितेत आहे. त्यामुळे कवितेतून वैश्विक विचार व्यक्त होणे आवश्यक असून विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले. शब्दगंध कविमंडळ, बेळगाव यांच्या वतीने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta