Tuesday , June 30 2026
Breaking News

मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी मागण्यावरून वाद; मित्राची दगडाने ठेचून हत्या

Spread the love

 

बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील वण्णूर गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी मागण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला नेसरगी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी हनुमंतप्पा यमनप्पा इतापी हा त्याचा मित्र विश्वनाथ सिद्धय्या पूजेरी (वय २९) याच्याकडे मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टीची मागणी करत होता. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापलेल्या विश्वनाथने हनुमंतप्पाच्या डोक्यात मोठा दगड घालून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात हनुमंतप्पाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेप्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेसरगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक रामुगोंडा बसरगी आणि बैलहोंगलचे डीवायएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी विश्वनाथ पूजेरी याला २८ जून रोजी अटक केली.

सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, अवघ्या ४८ तासांत खुनाचा उलगडा करून आरोपीला अटक करणाऱ्या नेसरगी पोलिसांच्या कामगिरीचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

रिमझिम पावसात भक्तिभावाचा दरवळ; वटपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात सुवासिनींची गर्दी

Spread the love  बेळगाव : पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे हिंदू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *